महाविकास आघाडी शासनाची दुर्दशा, शेतकऱ्यांना नाही उमेदीची आशा - प्रविण दरेकर

    05-Jul-2021
Total Views |

pravin darekar_1 &nb


विधीमंडळात आक्रमक भूमिका

मुंबई : राज्यातील शेतकरी त्रस्त आहे, मराठा, ओबीसी राजकीय आरक्षणावरून राज्य सरकार दिशाभूल करीत आहे, एमपीएससीचे प्रश्नही प्रलंबित आहेत, कोरोना संकट काळात सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अशा विविध मागण्यांसाठी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेऊन मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासह अनेक प्रश्नांवरून सरकारला जाब विचारणार असल्याचा असा इशाराही विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.


मराठा,ओबीसी आक्षणावरून राज्य सरकार दिशाभूल करत आहे. कोरोना संकट काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत असून सरकार MPSC बाबत गंभीर नाही आहे. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. सरकारचं आयोग काय करतंय, विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. तसेच, आज राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. महाविकास आघाडी शासनाची दुर्दशा असून शेतकऱ्यांना उमेदीची आशा नाही आहे. १४० कोटी विमा हपत्याची रक्कम भरली, आघाडी सरकारने फक्त ६७ कोटींची खिरापत वाटली. दुधाच्या दराचा प्रश्न प्रलंबित आहे. दूध दर प्रति लिटर १५ रुपयांवर गेलेला आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे. धानाचा प्रश्न गंभीर आहे, असे अनेक मुद्दयांवर सरकारला जाब विचारण्यात येईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले.