स्वप्नील लोणकरची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2021   
Total Views |

Mtb _1  H x W:


स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण राज्यातील तरुणांची मानसिक स्थिती दर्शवणारे एक विदारक उदाहरण आहे. मान्य आहे कोरोना आहे, सगळे ठप्प आहे. पण, स्वप्नीलच्या आत्महत्येने महाविकास आघाडी सरकारची इज्जत अगदी उघड्यावर आणली आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्‍या सर्वसामान्य घरातल्या स्वप्नीलने ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती मेहनत घेतली असेल हे सांगायला नको. त्याच्या पालकांनी लहानपणापासून त्यासाठी किती कष्टाची डोंगर उपसले असतील हेसुद्धा शब्दांत सांगू शकत नाही. स्वप्नीलच काय? गाव-खेड्यातून किंवा शहरातील सामान्य कुटुंबातील ‘एमपीएससी’ परीक्षार्थींचीही हीच परिस्थिती आहे. इतक्या सगळ्या कष्टाचे फलित काय मिळाले, तर नैराश्य आणि हतबलता आणि आत्महत्या? असो, सत्ता चालवणे हा एक कलमी कार्यक्रम कोणत्याही सरकारचा नसतो. सरकारने राज्यातील लोकांना जगण्यालायक परिस्थिती निर्माण करावी, असेही कार्य असतेच. मात्र, महाराष्ट्रात तसे कार्य होताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्वत: म्हणाले होते की, “आपल्याला आता कोरोनासोबत राहावे लागेल.” जर मुख्यमंत्री असे म्हणालेत तर मग त्यादृष्टीने खरेच काही उपाययोजना आहे का? आपण त्या दृष्टीने ‘एमपीएससी’ या क्षेत्राकडे बघू. ‘एमपीएससी’ परीक्षा, मुलाखती नियुक्ती याबद्दल सरकारचे धोरण काय होते? काय आहे? कोरोना कधी जाईल कोणाला माहिती नाही? समजा, कोरोना गेलाच नाही तर काय राज्य सरकार आणि पर्यायाने प्रशासनाने असेच हातावर हात धरून बसायचे का? कोरोना आहे, कोरोना आहे, म्हणत सगळेच ठप्प ठेवायचे का? कोरोना असो किंवा नसो माणसाचे जगणे, माणसाच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अबाधित आणि अमर आहेत. कोरोना आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या परिप्रेक्ष्यात स्वप्नीलची आत्महत्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर भयंकर भाष्य करते. स्वप्नीलने आत्महत्या केली नाही, तर त्याचा खून या निष्क्रीय राज्य व्यवस्थेने केला आहे. स्वप्नीलची स्वप्न पुलण्याआधीच कोमेजली. इथे सुशांत सिंगसारख्या अभिनेत्याची आत्महत्या पचवली गेली तर स्वप्नील लोणकर आत्महत्येबद्दल काय बोलावे?


काँग्रेसची श्वेतपत्रिका


काँग्रेसने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये काय असेल? तर केंद्र सरकाने हे करावे केंद्र सरकारने ते करावे? ही नुकसानभरपाई द्यावी ती नुकसानभरपाई द्यावी अशा सूचना. तसेही आजपर्यंत या पक्षाने स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी प्रत्यक्ष धडाडीने काही केले असे दिसत नाही. आता यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, हे विधान चुकीचे आहे. काँग्रेसने ७० वर्षांच्या काळात भारतात काश्मीर, उत्तर-पूर्व प्रदेश आणि कितीतरी देशाच्या सुरक्षा संदर्भातल्या समस्या निर्माण केल्या होत्याच ना? ‘गरिबी हटाओ’ म्हणत गरिबी हटवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हतेच ना? भ्रष्टाचाराबद्दल ‘ए टू झेड’ या शब्दांमध्ये तयार होईल, अशी बाराखडी बनवलीच ना? इतकेच काय? प्रत्येक सरकारी योजनांना नेहरू, इंदिरा आणि राजीव यांचे नाव दिले ना? भरीसभर राज्य घटनेची पायमल्ली करत आणीबाणीसारखे काळे शस्त्र उगारलेच ना, याचाच अर्थ काँग्रेसने काही केले नाही, असे म्हणणे चूक आहे. लोकांना काँग्रेसच्या कामाची आठवण कायम आहे. आता कोरोना काळात काँग्रेसने ही तिसर्‍या लाटेची श्वेतपत्रिका काढली आहे. यात आपण काय करणार? राजकीय पक्ष म्हणून आपण प्रत्यक्ष जनतेला कशी आणि काय मदत करणार? याबद्दल एक अवाक्षरही या श्वेतपत्रिकेत दिसत नाही. केवळ आणि केवळ केंद्र सरकारकडून मागण्या. आज सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जनतेला कोरोनाविरोधात मदत केली. कुणी ऐकले आहे का असे? नाहीच. ७० वर्षांपासून राजसत्तेत असणारा पक्ष आज देशाच्या या अडचणीच्या काळात केवळ सूचना सल्ले देत आहे. आजपर्यंत काँग्रेसने हे असेच केले आहे. असे केले पाहिजे तसे केले पाहिजे, हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे, असे सूचना देणे म्हणजे काँग्रेसची कार्यशैली आहे, हे लोकांना माहिती आहे. आताही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबतची श्वेतपत्रिका अशीच आहे. केवळ मागण्या.


9594969638
@@AUTHORINFO_V1@@