नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत भारतात ४४,१११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सहा दिवसांपासून ५० हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज ४,९५,५३३ इतकी आहे आणि ९७ दिवसांनंतर पाच लाखांपेक्षा कमी आहे.
२४ तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत १४,१०४ ची घट नोंदली गेली आहे आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ १.६२ टक्के आहेत. भारतातील बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या सलग ५१ दिवस नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत ५७,४७७ जण बरे झाले.
दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत १३ हजार (१३,३६६)पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. महामारीच्या सुरुवातीपासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी २,९६,०५,७७९ जण ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झाले आहेत आणि गेल्या २४ तासांत, ५७,४७७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०६ टक्के आहे, जो सतत वाढता कल दर्शवत आहे.