‘मेट्रो’ प्रकल्प अद्याप रखडलेला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2021   
Total Views |

metro_1  H x W:

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जपानच्या ‘जायका’ संस्थेने मेट्रोसाठी अर्थसाहाय्य दिले होते. मात्र, विद्यमान सत्ताधारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दुराग्रही राजकारणापायी हा प्रकल्प रखडला आहे. आज राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्याच ’जायका’कडे आरोग्यव्यवस्थेच्या अनुषंगाने हात पसरले आहेत. त्यामुळे मेट्रोबाबत झालेल्या राजकारणाचा परिणाम भविष्यातील गुंतवणुकीवर होणार का, हे आगामी काळात ‘जायका’च्या भूमिकेमुळे कळेल.
 
फडणवीस मुख्यमंत्री असताना ’जायका’ या संस्थेने साधारणतः दोन हजार कोटींपेक्षा जास्त अर्थसाहाय्य ‘मेट्रो-३’ साठी कर्जाच्या माध्यमातून दिले होते. विशेष म्हणजे, मुंबईच्या विकासाला जपानी हातभार लाभवा, यासाठी केंद्रातील मोदी सरकारनेदेखील पुढाकार घेतला होता. ’जायका’ संस्थेनेदेखील केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख मदत देत असताना केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ‘मेट्रो-३’ प्रकल्प रखडला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने दुराग्रही राजकारण केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणाचा परिणाम भविष्यातील गुंतवणुकीवर होऊ शकतो, असा इशारा त्यावेळी विरोधकांकडून देण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ‘मेट्रो-३’ बाबत समन्वयाची भूमिका घेतली नाही. आता त्याच जपानी संस्थेकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अर्थसाहाय्य देण्याची विनंती केली आहे.
कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली. सह्याद्री अतिथीगृह येथे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसाहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसाहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारणीसाठीदेखील ‘जायका’कडून आर्थिक साहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्करोग उपचारासाठी ‘रेडिएशन थेरपी’ उपचाराकरिता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसाहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरिता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या ‘जायका’ संस्थेमार्फत अर्थसाहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रोसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘जायका’कडून अर्थसाहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारणीसाठीदेखील ‘जायका’कडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.कर्करोग उपचारासाठी ‘रेडिएशन थेरपी’ उपचाराकरिता यंत्रणा उभारणीसाठी जपानकडून तंत्रज्ञान आणि अर्थसाहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरिता सहकार्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.





 
 
 
@@AUTHORINFO_V1@@