ठाण्यात लसीकरणात गोंधळ - लस केंद्राची कब्जा शिवसेनेचा

    03-Jul-2021
Total Views |

thane_1  H x W:
 
ठाणे : लसीचा पुरवठा नसल्याने ठाण्यात तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.दरम्यान, लसीचा साठा उपलब्ध झाल्याने शनिवारी लसीरकणाला सुरुवात होताच काही ठिकाणी लसीकरणावरून गोंधळ झाला.ठाण्याच्या शिवाईनगर लसीकरण केंद्रावर शिवसेनेच्या नगरसेविकामधील कार्यकर्त्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळाला.ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी कब्जा केला.तर, एका नगरसेविकेच्या पतीने आदल्या दिवशीच कुपन वाटल्याने प्रभागातील इतर नागरिकांनी संतापले.काही ठिकाणी वॉक इन लसीरकण केंद्रावरून परत पाठवल्याने नागरिकांनी हंगामा केला.अखेर,वर्तकनगर पोलिसांना पाचारण करून गर्दीला पांगवण्यात आले.
 
 
तिस-या लाटेचा धोका आणि कोरोनाच्या डेल्टा या प्रकारामुळे सध्या काहीसे भीतीदायक वातावरण आहे.त्यामुळ जो-तो लसीकरण करण्यासाठी धडपडत आहे. अगदी ८ दिवसांपूर्वी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट दिसत असे. काही वेळा तर लसीकरणासाठी लोक जमवावे लागत होते.मात्र आता परिस्थितीत बदल झाला असून तीन दिवस लसीकरण बंद राहिल्यामुळे शनिवारी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली.तीन दिवसानंतर ठाण्यात पुन्हा लसीकरणाला सुरूवात झाल्याने अनेक लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.लसीकरण केंद्रांवर सकाळी ७ पासून कूपन मिळवण्यासाठी गर्दी झाली होती. काही लसीकरण केंद्रांवर दुपारपर्यंत लसीकरण सुरूच न झाल्यामुळे लसीकरणासाठी उभे असलेले लाभार्थी हैराण झाले होते.काही केंद्रांवर कर्मचारीवृंदच पोहचला नसल्याच्या तक्रारी होत्या.यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळ सदृश्य परिस्थिती होती.शिवाईनगर येथील शिवसेना नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्या खासगी संस्थेची कुपन वाटुन मोफत लसीकरणाचा भ्रष्टाचार करून दाखवल्याचे दिसुन आले.तर , या ठिकाणी शिवसेना कार्यकत्यामध्ये राडा झाल्याने तणाव निर्माण झाला होता.
 
 
खासदाराने शिवसैनिकाला फटकावले
 
 
ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्यातर्फे मंगल कार्यालयात लसीकरणाचे आयोजन केले होते.येथे लसीचे फक्त तीनशे डोसच होते आणि हजारो नागरिक जमल्याने सकाळपासुनच रांगा लागल्या होत्या. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शिवसैनिक प्रयत्न करत असताना घुसखोरी होऊ लागल्याने गेटवर असणाऱ्या शिवसैनिकाला शिवसेना खा.राजन विचारे यांनी फटका मारला तसेच,ओळखीच्यांना कशाला आत सोडतो ? अशी दमबाजी केली.काही वेळातच खासदाराने फटकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.