१५ वर्षांच्या संसारानंतर आमीर-किरण झाले विभक्त!

    03-Jul-2021
Total Views |

aamir_1  H x W:
 
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतला. दोघांनी २८ डिसेंबर २००५ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या १५ वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आमिर आणि किरण यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती देण्यात आली.
 
 
दोघांनी लिहिले, "१५ वर्षे एकत्र घालवताना आम्ही आनंदाने प्रत्येक क्षण जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत - जो पती-पत्नी या नात्याचा नसेल, परंतु तो को-पॅरेंट आणि एकमेकांसाठी कुटुंब म्हणून असेल. आम्ही काही काळापूर्वी विभक्त होण्याचे ठरवले आणि आता आम्ही या वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझादचे को-पॅरेंट असून आणि एकत्र त्याचे संगोपन करु."
 
 
"आम्ही दोघेही चित्रपट आणि आमच्या पानी फाउंडेशन व्यतिरिक्त आमच्या आवडीच्या सर्व प्रोजेक्टवर एकत्र काम करत राहू. याकाळात आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबाचे मनापासून आभार. त्यांच्या पाठींब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो. आमच्या हितचिंतकांनीसुद्धा आमच्या घटस्फोटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहावे अशी आमची अपेक्षा आहे." असे या निवेदनात म्हंटले आहे.