भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव ; कृणाल पांड्या 'पॉझिटिव्ह'

    27-Jul-2021
Total Views |

Krunal Pandya_1 &nbs
 
 
मुंबई : कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत टी - २० मालिका खेळत आहे. आज (मंगळवारी) या मालिकेतील दुसरा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरु होणार होता. मात्र, एका भारतीय खेळाडूचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात येत असून हा सामना आता पुढे ढकलला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. कृणाल पांड्या याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून मंगळवारी होणारा सामना आता २८ जुलैला म्हणजेच बुधवारी होणार आहे. यावेळी सर्व खेळाडू आणि स्टाफचे अहवाल निगेटिव्ह आला तरच हा निर्णय घेण्यात येईल.
 
 
 
 
कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोमवारीच बीसीसीआयने सूर्यकुमार आणि पृथ्वी श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला रवाना होतील, असे सांगितले होते. शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्यामुळे हे दोघांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.