काश्मीरमध्ये स्फोटकांसह असलेले ड्रोन नष्ट करण्यास यश

    24-Jul-2021
Total Views | 61

drone_1  H x W:


स्वातंत्र्यदिनापूर्वी घातपात करण्याचा कट उधळला
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आले आहे. सीमावर्ती भागात पाच किलो ‘आयईडी’ हे स्फोटक बांधलेल्या ‘ड्रोन’ला नष्ट करण्यात यश आले आहे.
जम्मू जिल्ह्यातील कानाचक्क सेक्टरमध्ये असलेल्या गुडा पट्टन भागात गुरुवारी रात्री उशिया जम्मू-काश्मीर पोलिसांना एक ‘ड्रोन’ आढळून आले. प्रथम एका पोलीस उपनिरीक्षकांनी त्यावर आपल्या पिस्तुलातून गोळी झाडून ‘ड्रोन’ पाडले. त्यानंतर सदर ‘ड्रोन’वर तब्बल पाच किलो ‘आयईडी’ बांधल्याचे आढळून आले. या स्फोटकामार्फत १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापूर्वी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घातपात घडविण्याचा पाकिस्तानचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ‘ड्रोन’मध्ये पाच किलो ‘आयईडी’सोबतच अन् स्फोटकेदेखील लावल्याचे आढळून आले.
ज्या ठिकाणी ‘ड्रोन’ पाडण्यात आले, तेथून भारतीय सैन्याच्या अखनूर ‘डिव्हीजन’चे मुख्यालय केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासह ‘सीआरपीएफ’, स्थानिक पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा पाकचा मनसुबा पुन्हा स्पष्ट झाला आहे.
दरम्यान, गेल्या २० दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये ‘ड्रोन’ आढळून येण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी सर्वप्रथम २७ जून रोजी भारतीय वायुसेनेच्या तळावर दोन पाकिस्तानी ‘ड्रोन’ने बॉम्बस्फोट घडविले होते, त्यात दोन कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतरही चार ते पाच वेळा ‘ड्रोन’ पाडण्यात सुरक्षादलांना यश आले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121