कोथरुडमध्ये शिवसैनिकांनी भरवली निबंध स्पर्धा; विषय - 'आमचे उद्धव काका'

    21-Jul-2021
Total Views |
kotharud_1  H x
 
मुंबई - शिवसेनेच्या कोथरुड विधानसभेमध्ये एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'आमचे उद्धव काका' हा या निबंध स्पर्धेचा विषय असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. याचे निमित्त साधून कोथरुड विधानसभेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे. पहिला गट इयत्ता ५ वी ते १० आणि दुसरा गट हा खुला असणार आहे. या दोन्ही गटांना निबंध लिहण्यासाठी दिलेल्या विषयावरुन कोथरुड मतदारसंघासह पुण्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुलांना 'आमचे उद्धव काका' या विषयावर मुलांना निबंध लिहायचा आहे. स्पर्धक हे कोथरुड मतदारसंघातीलच असावे आणि त्यांनी २५ जुलैपर्यंत निबंध लिहून देण्याची अट स्पर्धेमध्ये घालण्यात आली आहे.
 
 
 

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या स्पर्धेचे पोस्टर टि्व्ट करुन म्हटले आहे की, " भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआता याबाबतीतही जाणत्या 'काकां'च्या स्पर्धेत उतरले आहेत. आमचे उद्धव काका..."लहान मुलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सकारात्मक आहे. त्यामुळे शिवसैनिक अशा प्रकारचे उपक्रम राबवून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देखील मोदींंसाखरीच करु पाहत आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.