दानिश आणि रवीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2021   
Total Views |

Ravish Kumar _1 &nbs


ज्या ‘सेक्युलॅरिझम’ची टिमकी दानिश यांनी वाजवली, त्यांचा अंत धर्मांधांनींच करावा? दानिश यांच्या मृत्यूचे वार्तांकन करताना दानिश यांच्याच जातकुळीचे पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटले की, “एका बंदुकीच्या गोळीने दानिश यांचा मृत्यू झाला.” पण ती गोळी कुणी, कुठून आणि कशासाठी मारली याबद्दल रवीश यांनी एक शब्दही उच्चारला नाही. कारण, ते सांगताना रवीश यांना तालिबानी दहशतवादाचा उच्चार करावा लागला असता. यातच रवीश यांच्या पत्रकारितेतला फोलपणा आणि एकांगीपणा दिसतो. रवीश यांच्या या पत्रकारितेशी दानिश यांच्या पत्रकारितेचे साम्य आहे. दानिश यांच्या मृत्यूनंतरच्या लोकभावनेतून रवीश काही बोध घेतील का?


दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला. दानिश यांच्या मृत्यूनंतर भारतीय समाजमाध्यमांमध्ये प्रकर्षाने उमटलेला सूर हा दानिशच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करणारा नव्हता. ज्यांनी हे प्रश्न उमटवले ते काही दानिशचे वैयक्तिक शत्रू नाहीत किंवा ते कधी दानिश यांना भेटलेही नसणार. तथाकथित निधर्मी पुरोगाम्यांच्या त्यातही डाव्या विचारसरणी, ‘सीएए’ विरोधकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या दानिश यांच्या मृत्यूवर लोकांनी असे का मत व्यक्त करावे? याचा मागोवा घेतला तर जाणवेल की, दानिश पत्रकारितेच्या मुखवट्याआड ज्या विचारांना लोकांसमोर मांडत होते, त्या विचारांपाठीमागे लपलेले सत्य लोकांनी जाणले होते. ‘सीएए’ विरोधात दिल्लीला ओलीस ठेवणार्‍या शाहीनबाग आंदोलनाची वाहवा केली, काही दलालांनी मोठ्या दलाल नेत्यांना हाताशी घेऊन शेतकरी आंदोलनाच्या नावावर देशाला बदनाम केले, त्या आंदोलनाचे समर्थन करत एकांगी भूमिका मांडली, कुणी कुणाला मारत असताना मारणारा हिंदू आणि मार खाणार गरीब बिचारा अल्पसंख्याक असे दाखवण्याचा प्रयत्न केला, घुसखोर रोहिंग्या मुसलमान कसे मजबूर आणि त्यांना मदत करणे भारतीयांचे कसे कर्तव्य असे उगाच भासवले, कोरोना काळात गंगा नदी आणि प्रेताचे कुभांड रचणे आणखी न जाणे काय काय? यामध्ये दानिश यांची पत्रकारिता चांगलीच बहरली होती आणि सगळा देश ते पाहत होता. ज्या ‘सेक्युलॅरिझम’ची टिमकी दानिश यांनी वाजवली, त्यांचा अंत धर्मांधांनींच करावा? दानिश यांच्या मृत्यूचे वार्तांकन करताना दानिश यांच्याच जातकुळीचे पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटले की, “एका बंदुकीच्या गोळीने दानिश यांचा मृत्यू झाला.” पण ती गोळी कुणी, कुठून आणि कशासाठी मारली याबद्दल रवीश यांनी एक शब्दही उच्चारला नाही. कारण, ते सांगताना रवीश यांना तालिबानी दहशतवादाचा उच्चार करावा लागला असता. यातच रवीश यांच्या पत्रकारितेतला फोलपणा आणि एकांगीपणा दिसतो. रवीश यांच्या या पत्रकारितेशी दानिश यांच्या पत्रकारितेचे साम्य आहे. दानिश यांच्या मृत्यूनंतरच्या लोकभावनेतून रवीश काही बोध घेतील का?


मुंबईकरांनी कायमच मरायचे?


मुंबईकरांनो, तुमचे ‘स्पिरीट’ अरबी समुद्रात फेकून द्या. कारण, ते ‘स्पिरीट’ दाखवून तुम्हाला ससेहोलपट असलेल्या त्रासमय जगण्याचे गुलाम केले आहे. 25 वर्षे तुमच्या डोक्यावर ‘मराठी अस्मिता-मराठी अस्मिता’ असा खोटा नारा देत मुंबई महानगरपालिकेचे ‘अनभिषिक्त सम्राट’ म्हणून कोण राज्य करत आहे? त्यांचा मलिदा, त्यांची वसुली त्यांना मिळते. त्यांची आलिशान घरे पाण्याखाली जात नाहीत की पावसात अडकलेल्या ट्रेनमध्ये ते किंवा त्यांच्या घरचे कुणीच भुकेने, तहानेने व्याकूळ होत तासन्तास ‘ट्रेन’ कधी सुरू होईल, म्हणून वाट बघणारे नाही. लोकल बंद, बस बंद, जीव मुठीत घेऊन भर पावसात गळ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात तुम्हाला कामाला चालत जायचेच आहे. तुंबलेल्या पावसात गटारात पडून तुम्हाला किंवा तुमच्याच कुणालातरी मरायचेच आहे. महानगरपालिकेत तुम्ही त्यांना सत्ता दिलीत. त्याबदल्यात तुम्हाला काय मिळाले? म्हणे 107 टक्के नालेसफाई केली. तरीही मुंबई तुंबली. विक्रोळी-चेंबूर भागात भूस्खलन झाले. कुटुंबांवर घाला आला, अनेक लोक मेली. बचावकार्य सुरू झाले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक प्रशासकीय यंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून त्या बचावकार्यात होते. भूस्खलनात कोसळलेल्या घरांना म्हणे आधीच शिवसेना सत्ताधारी असलेल्या महानगरपालिकेने धोकादायक म्हणून नोटीस बजावली होती. पण नोटीस देऊन महानगरपालिका जबाबदारी झटकू शकत नाही. इतक्या वर डोंगरकपारीत लोकांनी घरं बांधली तेव्हा ती सुखासुखी बांधली नव्हती. भ्रष्ट यंत्रणेचे आणि स्थानिक मुजोर नेतेमंडळींच्या चमच्यांचे हात ओले केल्याशिवाय या लोकांना इथे घरे बांधणे शक्यच नव्हते. मतं मागताना नेतेमंडळी वर्षा-दोन वर्षांआधी ‘स्ट्रॅटेजी’ ठरवतात की, कुठून, कुठच्या चमच्यांना तिकीट देऊन निवडून आणून त्यांच्या जन्माचे भले करायचे. मग, ज्या जनतेच्या मतांवर जिंकतात, त्या जनतेचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी त्यांच्याकडे काहीच ‘प्लान’ का नसतो? राजकारण असतेच असते, पण मुंबईकरांचे मरण इतके स्वस्त का करून ठेवले आहे? मुंबईच्या महापौरबाई म्हणतात, “मुंबई बशीसारखी आहे.” बशीसारखी आहे म्हणून मुंबईकरांनी कायमच डुबायचे का? मरायचे का?


@@AUTHORINFO_V1@@