जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग

    14-Jul-2021
Total Views |

women safety_1  


राज्यात महिलांवर अत्याचाराचे सत्र सुरूच ; चित्रा वाघ आक्रमक


मुंबई:
बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे.तसेच मुलींच्या सोशलमिडीया अकाउंटवर आणि पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या पवार समर्थकांवरून भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही ट्रोलरचे नाव तसेच अकाऊंटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत चित्रा वाघ यांनी राज्याच्या सायबर सेलवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी कोव्हीड हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचऱ्यासोबत अश्लील वर्तन केले असल्याचे प्रकरण वाघ यांनी माध्यमांसमोर आणले आहे.ठाणे महापालिकेच्या कोव्हीड रुग्णालयात जून २०२०रोजी एका मुलीची स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती केली.त्यानंतर तिचे काम बघून तिला असिस्टंट मेट्रेन म्हणून देखील बढती दिली. मात्र वर्षभरातच कागदपत्र योग्य नसल्याचे करण देत तिला कमी करण्यात आले.या सर्व प्रकरणामागे या मुली सोबत पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी अश्लील वर्तन केले असल्याचे आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. या मुलीला न्याय देण्यासाठी भाजप पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्या एकला घटनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,"११ वी शिकत असलेल्या मुलीला १२वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली. असल्या घटनांचे सत्र राज्यात सुरू आहे.जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत.थोड्या तरी लाजा शिल्लक ठेवा रे.."असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, वाघ यांनी आपल्या ट्विटरवरून काही फोटो शेअर करत त्या म्हणतात,"महाराष्ट्र सायबर सेलनं तातडीने यांच्या मुसक्या आवळाव्यात एखाद्या महिलेबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या ह्यावर तात्काळ कारवाई अपेक्षित आहे, यापूर्वीही अशाचं पद्धतीत वागलेले कारवाई न झाल्यानेचं या हरामखोरांची हिम्मत वाढली. यांची सर्व माहिती तुम्हाला देते, तुम्हाला यांना उचलायला मदत होईल," असे म्हणत त्यांनी या विकृतांच्या घरचा पत्ताच दिला आहे. पंढरी बोरुडे गाव मजलेशहर ता.शेवगाव जि.अहमदनगर, Mob 9322218764, अभिजीत पळसकर कमिन्स कंपनी पुणे, मोबाईल no+919011032150, ही माहीती देत तत्काळ कारवाई करा," अशी मागणी त्यांनी केली आहे.