मंत्रिमंडळ समित्यांचे पुनर्गठन, नव्या मंत्र्यांचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2021   
Total Views |


modi_1  H x W:


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदलानंतर आता केंद्र सरकारने मंत्रिमंडळ समित्यांचेही पुनर्गठन केले आहे. मंत्रिमंडळ सचिवालयातर्फे सोमवारी रात्री उशिरा त्याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली. पुनर्गठनामध्ये मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना विविध समित्यांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राजकीय विषयांच्या मंत्रिमंडळ समितीमध्ये आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, कामगार मंत्री भुपेंदर यादव, जलवाहतुक, बंदरे आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गुंतवणूकविषयक समितीमध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विनी वैष्णव यांचा समावेश केला आहे, पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष आहेत.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय विषयांच्या समितीमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, अनुराग ठाकूर आणि विरेंद्र कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्याच अध्यक्षतेखालील रोजदार आणि कौशल्य विकास समितीमध्ये रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव आणि जी. किशन रेड्डी यांचा समावेश केला आहे.}

दरम्यान, सर्वांत महत्वाच्या अशा संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पंतप्रधानांकडे सूत्रे असलेल्या या समितीमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे.




 
@@AUTHORINFO_V1@@