जळगाव : "मी माझी लढाई पूर्णपणे लढलो आहे. माझा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि त्यात ईमानदार राहीलो आहे", 'श्रद्धेय फादर स्टॅन स्वामी भावपूर्ण श्रद्धांजली' हे आम्ही म्हणत नाही तर शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडी, जळगाव तर्फे बॅनर लावण्यात आलेले आहे. फादर स्टॅन स्वामीच्या कारागृहातील मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर, अशा प्रकाराचा आशय आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून टीकेचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे फादर स्टॅन स्वामीसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. याशिवाय शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटोही बॅनरवर लावण्यात आलेले आहेत."
रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात 'फादर स्टॅन स्वामी एका गलितगात्र म्हाताऱ्याची भीती!' हा मथळ्याखाली स्टॅन स्वामीचा मृत्यू हा केंद्र सरकारने केलेली हत्या ठरली, असा आरोप केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या ख्रिश्चन आघाडीनेही राऊतांचीच तळी उचलून धरल्याने नवल वाटायला नको.