भाई जगताप यांच्याविरोधात तक्रार दाखल

    12-Jul-2021
Total Views |

Jagtap _1  H x



मुंबई : बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते भरल्याने झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार भाई जगताप आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पब्लिसिटी स्टंट करताना, मुक्या जीवांचा विचार केला नसल्याचे तक्रार अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 'जीवदया अॅनिमल अॅण्ड एन्वायरमेंट वेलफेअर ऑरगनायझेशन'तर्फे ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
 
 
आंदोलन करताना सर्वांनी बैलगाडीचा वापर करून बैलगाडीत क्षमतेपेक्षा ही जास्त माणसे तसेच गॅस सिलिंडरचा ही वापर केला गेल्यामुळे बैलगाडीला अतिभार सहन न झाल्यामुळे बैलगाडी पूर्ण पणे तुटून सर्व जण खाली पडले. सर्वजण एकमेकांना दुखापत झाली की नाही ते पाहात होते, परंतु कोणीही त्या मुक्या प्राण्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. Under Animal Protection Law & PCA act 1960 (prevention to cruelty to animals act) या कायद्यानुसार ही कारवाई करण्याची मागणी केली आहे.