शिवराय कुळकर्णी यांनी घेतला शिवसेना नेते राऊतांचा समाचार
मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन सामीचा पुळका आला आहे. ते फारच शोकविव्हळ असतील तर शिवसेनेने दहा दिवसांचा दुखवटा पाळावा व मातोश्रीवर सुतुक देखील पाळावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
Sanjay Raut and Shivsena stand on Stan Swamy
केंद्राकडे बोट दाखवण्याच्या सवयीनुसार मोदी सरकारला हुकूमशहा वैगेरे म्हणून संजय राऊत मोकळे झाले आहे. गलितगात्र म्हातारा दोषी नसतो तर मग सोशल मिडियावर केवळ एक व्यंगचित्र टाकले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडेपर्यन्त मारहाण करण्याच्या वेळी आपण का गप्प बसला होता ? कंगनाचे घर पाडताना, सोशल मिडियावर पोस्ट केली म्हणून पोलिसांचा जुम करणाऱ्या तुमच्या सरकारच्या हुकूमशाहीचा पाढा मोठा आहे. तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? मृत फादर स्टॅन स्वामी वर एनआयएने गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले आहेत.
shivrai kulkarni comment on shivsena stands on stan swamy
एनआयएची चार्जशीट म्हणते त्यांच्या तपासात उघड झाले की 'भूमिगत असलेला माओवादी मोहन याच्याकडून स्टॅन स्वामीला नक्षली कारवायांसाठी ८ लक्ष रुपये दिले गेले. तसेच त्याने Persecuted Prisoners Solidarity Committee (PPSC) नामक ऑर्गनायझेशन सुरू करावी.'
माओवादी संघटनांसोबत असलेल्या स्टॅन सामीच्या संबंधाच्या पुराव्यांचा NIA कडे खच लागला आहे. पण सत्ता स्वार्थासाठी हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला या प्रकरणाचे गांभीर्य समजू नये, हे जास्त घातक आहे. तुकडे तुकडे गॅंग मध्ये समाविष्ट होण्यात शिवसेना उतावीळ झाली असल्याचे आजच्या संजय राऊत यांच्या लेखावरून स्पष्ट दिसते, अशी टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. Shivsena MP Sanjay Raut Samana