'ईद'च्या पार्श्वभूमीवर भिवंडीत दोन गायी चोरीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2021   
Total Views |



sa_1  H x W: 0


गायी चोरी प्रकरणाची भिवंडीत पुनरावृत्ती

काल मध्यरात्रीचा धक्कादायक प्रकार; पोलिसांत तक्रार दाखल

भिवंडी (सोमेश कोलगे): बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतून दोन गाभण गायी चारचाकी गाडीचा वापर करून चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविषयी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जूनच्या दरम्यान असाच प्रकार मुंबईतील दादर परिसरात घडला होता. त्यावेळी रस्त्यावर फिरणार्‍या दोन गायींना चारचाकी गाडीत भरून चोरून नेण्यात आल्या होत्या.

कवाड, आनगाव भिवंडीत मंदार जयंत लेले यांचा गोठा आहे. मंदार लेले कवाड येथील रहिवासी आहेत. लेले स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत. तसेच त्यांचा स्वतःचा गोठा असून त्यात 9 जनावर असतात. दिनांक 9 जुलै रोजी पहाटे गोठ्यातील दोन गीरगायी बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुरुवार रात्री ते शुक्रवार पहाटेच्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याविषयी पोलिसात भा.द.वि कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तसेच रात्रीची संचारबंदी असताना दोन गायींची चोरी कशी होते, हादेखील प्रश्न उपस्थित होतो. भिवंडीच्या दृष्टीने गायींची चोरी हा गंभीर प्रश्न आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कारण आनगाव परिसरात गोशाला असून तिथे शेकडो जनावरांचा संचार असतो.


गेल्यावर्षी 6 जून 2020 रोजी असा प्रकार दादर, माटुंगा परिसरात घडला होता. रस्त्यावर फिरणार्‍या दोन गरोदर गायी गायब झाल्याचे लक्षात आल्यावर वकील धृतिमान जोशी यांनी पुढाकार घेऊन आजूबाजूच्या सीसीटीव्हीतून शोध घेतला. त्यावेळी दोन्ही गायी चारचाकी गाडीतून चोरीला नेत असल्याचा थेट व्हिडिओ समोर आला होता.



sa_2  H x W: 0
(गायी चोरीला गेल्यामुळे परिसरात अस्वस्थता पसरली होती)


विशेष म्हणजे भिवंडीत झालेल्या चोरी प्रकरणातही एका स्कोर्पिओ गाडीतून गायी चोरीला गेल्या असल्याचा संशय आहे. लेले यांनी एका संशयित चार चाकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले आहेत. 


गावच्या मध्यभागी भर वस्तीत हा प्रकार घडला आहे. संचारबंदीत रात्री लोक येऊन गायीचे दोर कापून गायी चोरीला नेण्याचे प्रकार गंभीर आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार घडताहेत. आपल्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. भिवंडी संवेदनशील भाग असल्यामुळे प्रशसनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली पाहिजे. ग्रामस्थ स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेत आहेत.

- मंदार लेले, गौ-पालक, भिवंडी
@@AUTHORINFO_V1@@