महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी भायखळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयाचे निरिक्षण केले
मुंबई : आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. २९.६.२०२१ रोजी भायखळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे रुग्णालयाचे निरिक्षण केले. रुग्णालयात आरोग्य सुविधांच्या सुधारणा लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांत अनेक मशीन्स रेल्वे कर्मचार्यांच्या फायद्यासाठी खरेदी केल्या आहेत. कंसल यांनी अत्याधुनिक “कॉम्प्यूटर असिस्टेड स्ट्रेस एक्सरसाइज इलेक्ट्रोकार्डिओग्राफी सिस्टम (टीएमटी मशीन)” सह ओपीडी कार्डियोलॉजिकल सेवांना समर्पित संपूर्ण “वातानुकूलित व सुसज्ज“ हार्ट स्टेशन”चे उद्घाटन केले.
कंसल यांनी रिमेटोलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, पल्मोनोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेमॅटोलॉजी अशा सात सुपर स्पेशॅलिटीज समर्पित सुपर स्पेशॅलिटी ओपीडी सेवांचे उद्घाटन केले. प्रगत दंत खुर्ची युनिट, अत्याधुनिक ओपीजी मशीन (सीटी स्कॅनसाठी अपग्रेड करण्यायोग्य), ग्लास बीड स्टिरिलायझर्स यासारख्या अत्याधुनिक उपकरणासह सुसज्ज असलेल्या दंत, ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे नूतनीकृत व अपग्रेडेड पूर्णतः वातानुकूलित विभागाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यांनी उच्च श्रेणीची चांगली सुसज्ज नेत्र कक्षा, कान-नाक-घसा (ईएनटी) आणि त्वचा कक्षांच्या पूर्णतः वातानुकूलित प्रक्रियात्मक बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णालयाच्या स्वयंपाकघरांसह हॉस्पिटलच्या ऑक्सिजन मॅनिफोल्ड रूमची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी कोक्लीयर (Cochlear) इम्प्लांट मशीन, श्रवणयंत्र इत्यादींच्या तरतूदीबाबत चौकशी केली आणि संबंधित अधिका-यांना जलदरीत्या प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले.
महाव्यवस्थापकांनी रेल्वे कर्मचार्यांना चांगल्या सेवा देण्यास तसेच रेफरल खर्च कमी करण्यावर आणि इनहाऊस उपचारांवर भर देण्यास सांगितले.कंसल यांनी तळ +६ (जी + ६) मजली सुपर स्पेशॅलिटी बिल्डिंगच्या सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कामांच्या प्रगतीचा तसेच १० केएल लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) प्लांटच्या तरतुदीसह मेडिकल गॅस पाइपलाइन & सक्शन सिस्टम (एमजीपीएस) आणि ९६० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मितीच्या स्थापनेचा तपासणी दरम्यान आढावा घेतला. कंसल यांनी आरोग्य सेवा, मुख्यालयातील स्टोअर्स व लेखा शाखा यांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी व मुंबई विभागाला नवीन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पुरस्कार जाहीर केले. महाव्यवस्थापक यांच्यासमवेत वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (हॉस्पिटल मॉनिटरींग ग्रुपसाठी नोडल ऑफिसर), प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.या निरिक्षणा दरम्यान सर्व कोविड प्रोटोकॉल आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.