जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला १२ वर्षीय अभिमन्यू

    01-Jul-2021
Total Views |

Abhimanyu_1  H
 
 
नवी दिल्ली : भारतीय वंशाचा अभिमन्यू मिश्राने अमेरिकेत इतिहास रचला आहे. न्यू जर्सीमध्ये स्थायिक असलेल्या अभिमन्यूने जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याने '१२ वर्ष ४ महिने आणि २५ दिवस' इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर होण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या आधी या रेकॉर्ड रशियाच्या सर्गेई कर्जाकीम (१२ वर्ष ७ महिने) याच्या नावावर होता. बुडापेस्टमध्ये झालेल्या ग्रँडमास्टर स्पर्धेत अभिमन्यूने भारतीय ग्रँडमास्टर लिऑन मेनडोन्का याला पराभूत करत हा विक्रम केला.
 
 
 
अभिमन्यूचे वडील हेमंत मिश्रा न्यू जर्सीमध्ये डेटा मॅनेजमेंटचे काम करतात. अडीच वर्षाचा असताना वडिलांकडून त्याने या खेळला सुरुवात केली होती. तसेच, पुढे वयाच्या ५व्या वर्षापासून स्थानिक स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. तो अमेरिकेतील सर्वात कमी वयाचा राष्ट्रीय विजेता बनला. त्यानंतर १०व्या वर्षीच त्याने जगातील सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा इतिहास रचला.
"वयाच्या ९व्या वर्षी ७० वर्षांच्या अनुभवी खेळाडूला पराभूत केले होते. अभिमन्यूमध्ये असमान्य गुणवत्ता असल्याची आमची खात्री होती. तो जे काही पाहतो ते त्याला लक्षात राहते. त्याला आजही २०१४ किंवा २०१५ साली झालेल्या मॅचमधील चाली लक्षात आहेत," असे त्याचे प्रशिक्षक अरुण प्रसाद सांगतात.