देशात दिवसभरात ४५,९५१ नवे रुग्ण

    01-Jul-2021
Total Views |

corona_1  H x W
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार, ९५१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या सध्या ५ लाख, ३७ हजार, ०६४ इतकी आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या ही एकूण रुग्णसंख्येच्या १.७७ टक्के इतकी आहे. देशात आतापर्यंत एकूण २ कोटी, ९४ लाख, २७ हजार, ३३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणार्‍यांची संख्या जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९६.९२ टक्के झाला आहे. साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ (रूग्ण संक्रमणाचा) दर पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला असून सध्या हा दर २.६९ टक्के इतका नोंदवला गेला आहे. दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर २.३४ टक्के इतका असून सलग २३ व्या दिवशी हा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.