राज्यपालांनी ठाकरे सरकारला सुनावले; पत्रातून केल्या 'या' मागण्या

    30-Jun-2021
Total Views |

govoerner_1  H



मुंबई :
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार ? अशी विचारणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने २३ जून रोजी राजभवन येथे राज्यपालाची भेट घेत काही मागण्या केल्या होत्या याच मागण्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, देवेंद्र फडणवीस, मा. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली विधानमंडळ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने दिनांक २३ जून २०२१ रोजी राजभवन येथे भेट घेऊन, दोन निवेदन मला सादर केले  आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्यांवर आग्रही मागणी केली आहे.

१. विधानमंडळाचे अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेणेबाबत

२.विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही कारण्याबात
आणि

३. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सद्यस्थितीत न घेण्याबाबत.
 
तसेच पुढे राज्यपाल म्हणतात की, तीनही विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावे.

येत्या ५ जुलैपासून विधानसभेचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु होते आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार अशी विचारणा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही आहे. याच अधिवेशनात ही निवडणूक होईल आणि त्यात विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती.दरम्यान शिवसेनेने काल आपल्या सर्व आंद्रणासाठी व्हीप जारी केला आहे. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने हा व्हीप जारी केला असल्याची चर्चा आहे. मात्र मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थांमधील रद्द झालेलं अतिरिक्त आरक्षण, कोरोना रुग्णसंख्या, कोरोना लसीकरण, अनिल देशमुख प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे घटलेलं दर यामुळे विरोधी पक्ष भाजप सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता असल्याने देखील शिवसेनेने दक्षता म्हणून त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.