देशात १.३२ लाख नवे ‘कोरोना’ रुग्ण देशात १.३२ लाख नवे ‘कोरोना’ रुग्ण
नवी दिल्ली : भारतातील दैनंदिन नवीन रुणांच्या संख्येमध्ये सतत घसरण झालेली आढळून येत असून, भारतात गेल्या २४ तासांत १.३२ लाख इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत दैनंदिन १ लाख, ३२ हजार, ७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवशी दोन लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात दैनंदिन नवीन सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे.
आज १७ लाख, ९३ हजार, ६४५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत सक्रिय रूग्णसंख्येत एकूण १ लाख, ०१ हजार, ८७५ इतकी घसरण झाली. आता सक्रिय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णांच्या ६.३४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २ लाख, ३१ हजार, ४५६ जण बरे झाल्याची नोंद झाली आहे. दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत ९८ हजार, ६६८ हून अधिक जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
आतापर्यंत २ कोटी, ६१ लाख, ७९ हजार, ०८५ नागरिक ‘कोविड-१९’ या आजारातून मुक्त झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत २ लाख, ३१ हजार, ४५६ रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर ९२.४८ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत एकूण २० लाख, १९ हजार, ७७३ चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण ३५ कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशभरात एकूण संख्या २१.८५ कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या २४ तासांत एकूण २१ कोटी, ८५ लाख, ४६ हजार, ६६७ लसींच्या मात्रा दिल्या गेल्या आहेत.