एक हौस पुरवा महाराज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2021   
Total Views |


ram madir sanjay raut_1&n
 
अयोध्येत राम मंदिर घोटाळा झाला आहे. ऐका हो ऐका... अरे ऐका, मी बोलतोय, मी...! राज्य सरकारच्या आघाडीचा शिल्पकार. हो, हो! मीच तो ज्याला आघाडी होण्यासाठी सगळ्या महाराष्ट्राच्या शिव्या खाव्या लागल्या. त्यावेळी सगळ्यांनी माझे ऐकले आणि महाराष्ट्रात आमचे महासरकार आले. हो, हो! महाशिवआघाडी नाव होते. पण, काय आहे ना? मॅडम आणि थोरल्या साहेबांच्या म्हणजे बारामतीच्या साहेबांच्या मनाचा विचार करून आम्ही ते नाव मागे घेतले.


आम्ही शिव हे नाव कुठेही वापरतो. त्यात काय शिव वडापाव माहिती असेलच. इतकेच काय आमच्या चार लोकांनी एकट्या दुकट्याला गाठून मारले तर आम्ही लगेच शिव प्रसाद म्हणतो. काय म्हणता, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे? काय म्हणता, आम्ही सत्तेच्या पिंडाला हपापलेले कावळे आहोत? असू देत. तर विषय हा आहे की, आम्ही सत्ताधारी आहोत. महाराष्ट्रात जशी सत्ता आणली तशी देशातही आणू. या देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती आमचाच होणार. अगदी रोखठोक म्हणजे रोखठोक. ते होण्यासाठी देशभरात आमचे नाव तर पोहोचायला हवे ना? मुंबईत लोक ओळखतात. महाराष्ट्रातही शिव्याशाप देऊन का होईना लोक ओळखतात. आता देशभरात ओळख कशी होईल? आम्ही स्ट्रॅटेजीने जाऊ. अभ्यास करून सांगतो, या देशात तीन प्रकारेच आम्ही प्रसिद्ध होऊ. एक नरेंद्र मोदींना शिव्याशाप देऊन, दोन रा. स्व. संघाबाबत बोलून आणि तिसरे आता अयोध्या राम मंदिराबाबत बोलून. हे तीन विषय कसे हिट आहेत, म्हणजे आम्ही नॉटी असू, पण, त्याचा उपयोग झिरो. त्यामुळे या हिट विषयावर कहीबाही बोलले की, आपल्याला एकदम हिट होता येते. काय म्हणता, आमच्या लोकांनी घोटाळे केले? त्यांच्यावर कारवाई होत आहे. मग काय झाले? हे बघा भाजप, मोदी, रा. स्व. संघ आणि अयोध्या राम मंदिराबाबत बोलतोय म्हणजे. राष्ट्रीय विषयावर बोलतोय. एक हौस पुरवा महाराज... मला राष्ट्रीय नेता समजा!


मोठे शास्त्रज्ञ


हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे या सरकारचे शिल्पकार शरद पवार यांचेे म्हणणे आहे. टिकेल, विकेल, पिचेल की आणखी काही होईल, याबद्दल विचार करण्याची त्यांना गरजच नाही. सत्तेसाठी, त्या सत्तेच्या मतांसाठी मुंबईकरांच्या जीवनाची होळी करणार्‍या त्या भीषण बॉम्बस्फोटात बळेच १३ वा बॉम्बस्फोट घुसवणार्‍या या भयंकर राजकारण्यांकडून अपेक्षा काय करायची? ‘अपना काम बनता, ** में जाय जनता’ अशी संकल्पना इमाने इतबारे राबवताना या राजकारण्याला महाराष्ट्राच्या मातीचे इमान असणार असे गृहित धरणे म्हणजे एक प्रकारे विनोदच आहे. हं! पण, दुसरी कसलीही दूरदृष्टी नसली तरी आपल्यासारखे सत्तांध आणि त्याद्वारे मदांध झालेले कोण कोण आहेत? हे ओळखण्याची आणि त्यांना आपल्या वळचणीत मुकाट बसवण्याची किमया यांना मस्त जमते. लालची सत्ताधीशांचे मनोरथ ओळखून त्यांना सत्तेच्या पिंजर्‍यात अडकवणे, आपल्या मताप्रमाणे पिंजर्‍यात नाचवणे, हे जमले केवळ आणि केवळ पवारांना. आता कोणे एकेकाळी काका मैद्याचे पोते होते. पण, आता सत्तेचे अमृतदूत आहेत.



 राजकारण हे असेच असते. पण, ते तसे नव्हे; त्यापेक्षा किळसवाणे बनवायचे विकृत प्रताप सगळ्यांनाच जमतात असे नाही. त्यासाठी पवार किंवा त्यापुढे जाऊन वडिलांच्या वचनाखातर मुख्यमंत्री बनावे लागते.असो. हे सरकार पाच वर्षे टिकणार, असे शरद पवार म्हणत आहेत. त्यांच्या या म्हणण्याने मात्र राज्य सरकारातील इतरपक्षीय नेत्यांना घाम फुटला आहे. कारण, सलमान खानचा प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘जो मैं बोलता हू, वो मैं करता हूं, मगर जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं।’ काकांच्या मनातला डायलॉग त्याहीपेक्षा भन्नाट आहे तो म्हणजे ‘जो मैं सोचता हूं, वो मैं नहीं बोलता, और जो मैं नहीं बोलता हूं, वो मैं करता नहीं।’ हे एक शास्त्र असते. त्या शास्त्राचे मोठे शास्त्रज्ञ कोण आहेत, हे सांगायला हवे का?







@@AUTHORINFO_V1@@