जन्मतःच बाळाला उलटे पाय! बाळाला सोडून नातेवाईक पसार

    23-Jun-2021
Total Views |

baby _1  H x W:




डॉक्टर म्हणतात, उभ्या कारकिर्दीत असा प्रकार पाहिला नाही!

इंदूर : मध्यप्रदेशात हरदा जिल्हा रुग्णालयात एका विशेष बाळाने जन्म घेतला. त्या बाळाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून उलटे आहेत. पायाचे पंजे पाठीच्या बाजूला आहेत. डॉक्टरांनी हा दुर्मिळ प्रकार असल्याचे म्हटले आहे. न्यू बॉर्न चाइल्ड केयर युनिटमध्ये (SNCU) बाळावर उपचार सुरू आहेत. खेदजनक बाब म्हणजे या बाळाचे आई-वडील बाळाला रुग्णालयातच सोडून पळाले आणि ३६ तासानंतर परतही आले.
 
 
 
झांझरी या गावातील विक्रम या व्यक्ती पत्नी पप्पी हीने सोमवारी दुपारी १२ वाजता एका मुलीला जन्म दिला. प्रसुती सामान्य झाली होती. मात्र, जन्मतःच बाळाचे पाय उलटे होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. सनी जुनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या कारकीर्दीत मी असा प्रकार पाहिला नव्हता.
 
 
इंदौर आणि भोपाळच्या बालरोग तज्ज्ञ आणि हाडांच्या डॉक्टरांनीही याबद्दल चर्चा केली. त्यांच्या मते, बाळाला जन्मतःच असा प्रकारचा दोष हा दुर्मिळ मानला जातो. मुलीचे वजन हे सहाशे ग्राम आहे. बाळाचे वजन हे सरासरी २ किलो सातशे ग्राम ते ३ किलो २०० ग्रॅाम इतके असते.
 
 
या बाळाला त्याचे आई-वडिल सोडून गेले होते. मात्र, बाळाच्या नातेवाईकांसाठी घोषणा रुग्णालयाच्या आवारात वारंवार केल्या जात होत्या. जन्मानंतरच आई-वडिल मुलीला सोडून गेले होते. मंगळवारी रात्री ८.३० वाजता रुग्णालय परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, काहीच उपयोग झाला नव्हता. रात्री १२ वाजता नवजात बाळाची आज्जी मुनीया बाई आणि वडिल विक्रम रुग्णालयात पोहोचले. त्यांचे म्हणणे होते की आम्ही परिसर सोडून कुठेच गेलो नव्हतो.
 
 
 
शस्त्रक्रीयेनंतर पाय सरळ होऊ शकतात
 
 
इंदौरचे हाडांचे डॉ. पुष्पवर्धन मंडलेचा यांच्या मते, असा प्रकार आईच्या गर्भात जागा कमी असल्याने किंवा अनुवंशिकरित्या होऊ शकतो. लाखो बाळांमध्ये एकदा असा दुर्मिळ प्रकार घडतो. शस्त्रक्रीयेनंतर गुडघे सरळ केले जाऊ शकतात. बाळाला पाहिल्यानंतरच पुढील उपचाराबद्दल सांगितले जाऊ शकते. या प्रकारची केस मीही पाहिली नाही, असेही ते म्हणाले.