नवी दिल्ली : मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २ जण ठार झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांतून देण्यात येत आहे. तसेच, १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली. हाफिज ज्या परिसरामध्ये राहतो, तिथून काहीच अंतरावर असलेल्या एका घरात हा स्फोट झाला.
पाकिस्तानी माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात असलेल्या एका घरात हा स्फोट झाला. तेथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. इथून काहीच अंतरावर हाफीज सईदचे घर आहे. मात्र, यावेळी तो त्या गह्रात होता का? याबद्दल अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या भीषण स्फोटामध्ये १० ते १२ जण जखमी झाले असून ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.