मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने बुधवारी ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई केली. एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला बेड्या ठोकल्या. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली.
गेल्या वर्षभरापासून एनसीबीने मुंबईत कारवाई करुन ड्रग्ज प्रकरणी अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबीच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले. त्यानंतर आता एनसीबीने ही कारवाई केली.