तुमचे नियम नव्हे, भारतीय कायदेच मानावे लागतील; संसदीय समितीचा ट्विटरला इशारा

    19-Jun-2021
Total Views |
twitter_1  H x


ट्विटरची मुजोरी सहन केली जाणार नाही
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारतात व्यवसाय करणार असाल तर तुमचे नियम नव्हे, तर भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागेल; अशा शब्दात संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने ट्विटरला नुकताच दिला आहे.
 
 
 
केंद्र सरकारने समाजमाध्यमे आणि डिजीटल माध्यमांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्याचे पालन करण्यास ट्विचर वगळता अन्य सर्व माध्यमांनी तयारी दाखविली आहे. मात्र, ट्विटरने नियमावलीचे पालन करण्यास नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या माहितीची सुरक्षा आणि ट्विटरचा होणारा गैरवापर या विषयावर खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींना समितीसमोर पाचारण केले होते.
 
 
 
समितीने ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींना समाजमाध्यामाचा होणारा गैरवापर, डेटा सिक्युरिटी आणि नागरिकांची सुरक्षा याविषयी ट्विटरच्या प्रतिनिधींची जबानी नोंदविण्यात आली. समितीच्या सदस्यांनी ट्विटरच्या प्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. ट्विटर इंडियाची कार्यप्रणाली आणि व्यवस्था याविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले. त्याचप्रमाणे ट्विटरची फॅक्ट चेकींक प्रणाली आणि त्यामध्ये सहभागी व्यक्ती याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना ट्विटरतर्फे समाधानाकारक उत्तरे प्राप्त झाली नाहीत. यावेळी ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींनी ते ट्विटरच्या धोरणांप्रमाणे काम करीत असल्याचे व केवळ त्याचेच पालन करीत असल्याचे समितीसमोर सांगितले. समितीने त्यास तीव्र आक्षेप नोंदविला आहे. भारतात व्यवसाय करणार असाल तर भारतीय कायद्यांचे पालन करावेच लागेल, अशा शब्दात संसदीय समितीने ट्विटरला इशारा दिला आहे.