पर्यावरणप्रेमींनी राबविले नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियान

    10-Jun-2021
Total Views |

nashik _1  H x



नाशिक :
नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून नंदिनी नदीच्या १५किलोमीटर अंतराच्या १० टप्यांत नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी नंदिनी नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरण प्रेमींची आरोग्य साखळीद्वारे जनजागृतीचा उपक्रम नुकताच राबविला. नंदिनी नदीची स्वच्छता राखली जावी यासाठी नाशिक भाजपच्या पर्यावरण मंचातर्फे नंदिनी नदी प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत भाजपच्या शेकडो पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला अशी माहिती नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली. पुढे सावजी म्हणाले की, गुरुवार दि.२४ जून रोजी वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपतील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार ३००० वृक्षरोपणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. तत्पुर्वी वृक्षारोपणासाठी महापालिकाच्या सहकार्याने जागा निश्चिती करण्यात येणार आहे.


ही मोहिम यशस्वी होण्यासाठी भाजप महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, भाजप शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पर्यावरण मंच संयोजक उदय थोरात, प्रकल्प संयोजक, प्रदेश भाजप सरचिटणीस देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खा.भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर सतिष कुलकर्णी, आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरूण पवार, भास्कर राव घोडेकर, देवदत्त जोशी, सुनिल देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके, अमोल इघे आदींनी विशेष परिश्रम घेतले.टाकळी ते पुणे रोड नंदिनी नदी पूल दक्षिण बाजूने नंदिनी नदी पुनरूज्जीवन व संवर्धन अभियान नंदिनी नदीची आरती नगरसेवक अनिलभाऊ ताजनपुरे व प्रा.कुणाल वाघ यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी पर्यावरण प्रेमींनी माय नंदिनीला हवे जीवनदान..चला राबवू स्वच्छता अभियान..ओळखा आपली जबाबदारी..कचरा नका टाकू नंदिनीच्या तिरी.. नंदिनीचा श्वास गुदमरला आहे..गटारीच्या घाणीनं भरला आहे..स्वच्छता अभियानं छेडायचा,संकल्प आमचा ठरला आहे.नंदिनी करू स्वच्छ निर्मळ..आरोग्याचे फुलवू कमळ..शुद्ध पाणी क्षणोक्षणी..स्वच्छ करू नदी नंदिनी..६)स्मार्ट सिटी नाशिक साठी..स्वच्छता आणू नंदिनी काठी..नंदिनी वाचली तर नाशिक वाचेल..स्वच्छतेने शहरात आरोग्य नांदेल.. नदी नंदिनी जर स्वच्छ झाली..नाशिक होईलच वैभवशाली..मनात जागवा स्वच्छतेचा ध्यास..नंदिनी मागतेय मोकळा श्वास.. माय नंदिनीचा करा सन्मान..नदीपात्रात टाकू नका घाण.. प्रदुषणमुक्ती ने देऊ, नाशिकला नवा आकार ..स्वच्छ निर्मळ नंदिनीचे स्वप्न करू साकार... घोषणांचे फलक हातात घेवून पर्यावरण जनजागृतीच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी भाजप नगरसेवक, पदाधिकारी,कार्यकर्ते यांसह पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.