महिला सुरक्षितता : रोज मरे त्याला कोण रडे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

mumbai _1  H x

'त्या' महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण ?


प्रसूती रजा संपवून कामावर रुजू झालेल्या विद्या पाटील या ३५ वर्षीय महिलेचा मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्यासोबतच्या झटापटीत लोकलखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेने नेहमीप्रमाणेच रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण ?

कोरोना महामारीच्या काळात हातची नोकरी गेली तर पोरीच्या शिक्षणाचे आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे काय? हाच विचार करून प्रसूती रजा संपवून कामावर रुजू झालेल्या विद्या पाटील या ३५ वर्षीय महिलेचा मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्यासोबतच्या झटापटीत लोकलखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेने नेहमीप्रमाणेच रेल्वेतील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय हाच विषय जाणून घेऊया.


मुंबईत महिला कर्मचारी वर्गाचे प्रमाण वाढत


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे आज मुंबईत महिला कर्मचारी वर्गाचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा रात्री उशिरापर्यंत महिलांना लोकलने प्रवास करावा लागतो. त्यापैकी अनेक महिला प्रवासादरम्यान एकट्याच असतात. सद्यस्थितीत तर केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आलीय. त्यामुळे रात्रीच नव्हे तर दिवसही रेल्वे डब्यात बोटावर मोजता येईल इतकेच प्रवासी असतात. महिला डब्यात तर प्रत्येक फेरीत केवळ ४ते५ महिला प्रवासी डब्यात असतात.


सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना एक महिलेचा जीव जाण्याची वाट पाहावी लागली का?


याचच फायदा घेत मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान कळवा स्थानकावरुन लोकल सुटताच फैजल शेख नामक चोर महिलांच्या डब्ब्यात घुसला. यावेळी डब्ब्यात फक्त पाच महिला प्रवास करत होत्या.त्यापैकी काही महिलांच्या हातातून मोबाईल हिसकावल्यानंतर चोराने लोकलमधून उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळेस विद्या पाटील यांनी धाडस दाखवत या चोराच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाठलाग करताना चोराने दिलेल्या धक्क्याने विद्या पाटील या लोकलखाली आल्या व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोबाईलची चोरी करण्यासाठी विद्या पाटील यांच्यासोबत झटापट करणारा फैजल शेख याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केलीय. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूवीर्ही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. मात्र या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना एक महिलेचा जीव जाण्याची वाट पाहावी लागली का? सराईत गुन्हेगार आजपर्यंत पोलिसांच्या हाती का लागला नव्हता?


चोरटा रेल्वे प्लँटफॉर्मवर आलाच कसा?


रेल्वे यार्ड आणि परिसरात महिलांवर होणारे हल्ले, चोरीच्या वाढत्या घटना आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून नेहमी नवनवीन उपक्रमांची घोषणा होते. ते उपक्रम प्रत्यक्षात कधी उतरणार? कित्येक महिलांनी यापूर्वीही या सहा घटनांमधून आपले जीव गमावले आहे. तरीही आजही नियमांच्या अंमलबजावणीची व काटेकोर पालन होतात की नाही हे तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ?आणि जर महिला डब्यात सुरक्षा रक्षक असतात तर मग अशा घटना घडतात तेव्हा ते कुठे होते? राज्यातील कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे.आज सर्वसामान्य नागरिक, महिला आणि पत्रकार यांनाही लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. अशावेळी हा शेख नामक चोरटा रेल्वे प्लँटफॉर्मवर आलाच कसा? मग सरकारचे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांना कोंडीत पकडण्यासाठीच आहेत का? चोरटा पळून जात होता त्याने महिलेला धक्का दिला तरीही तिथे पोलीस सुरक्षा रक्षक कोणीच कसं नव्हतं?


रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांशी बोलून एखादा सर्व्हे केला आहे का?


दरम्यान आता याप्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, तसेच ही घटना घडली तेव्हा संध्याकाळी ६ नंतर महिलांच्या डब्यात GRP/RPF जवान असणे बंधनकारक असतांना ते का उपस्थित नव्हते? असा सवाल केलाय. आज रात्री-अपरात्री प्रवास करताना महिलावर्गाच्या राखीव डब्यातून प्रवास टाळतात. त्याऐवजी सर्वसाधारण डब्यातून प्रवास करतात. आजही महिलांकडून रोज तक्रारी दाखल होत आहेत. महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांशी बोलून एखादा सर्व्हे केला आहे का? त्यांच्या काय अपेक्षा आहेत याची माहिती घेतली आहे का? बऱ्याचदा तर सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारीही मोबाईलवर मशगूल असतात अशा सुरक्षा रक्षकांची तक्रार करण्यासाठीही रेल्वे प्रशासनाने पाऊल उचललेलं पाहिजे.केवळ घटना घडली की कागदी नियम बनवून हा प्रश्न नक्कीच सुटणार नाहीये.
@@AUTHORINFO_V1@@