नवी दिल्ली : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरणाचा वेग जून महिन्यात आणखीन वाढणार आहे. कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून जून महिन्यामध्ये तब्बल १२ कोटी लसींच्या मात्रा उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने रविवार, दि. ३० मे रोजी देण्यात आली आहे. जून महिन्यासाठी आरोग्य सेवा कामगार (एचसीडब्ल्यू),आघाडीवरचे कामगार (एफएलडब्ल्यू) तसेच ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी ‘कोविड’ प्रतिबंधक लसींच्या ६.०९ कोटी मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जाणार आहेत.
याव्यतिरिक्त, राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांना थेट खरेदीसाठी ५.८६ कोटींपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध असतील. त्यामुळे जूनमध्ये १२ कोटी लसींच्या मात्रा राष्ट्रीय ‘कोविड’ लसीकरण कार्यक्रमासाठी उपलब्ध असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जूनमध्ये १० कोटी लसी उपलब्ध करणार; ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे केंद्र सरकारला पत्रजूनमध्ये १० कोटी लसी उपलब्ध करणार; ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे केंद्र सरकारला पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जून महिन्यात अधिकाधिक लसींचा पुरवठा करणार असल्याचे म्हटल्यानंतर ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने या महिन्यात दहा कोटी लसींचे उत्पादन करणार असल्याचे केंद्र सरकारला पत्राद्वारे कळवले आहे.
जूनला दहा कोटी लस देणार असल्याचे सांगितले आहे. यात म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जून महिन्यात आम्ही दहा कोटी ‘कोव्हिशिल्ड’ व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात साडेसहा कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लसींचे उत्पादन वाढवले आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे, असे कंपनीच्यावतीने पत्रात म्हटले आहे.