ठाकरे सरकारकडून उपेक्षा, रायकर कुटूंबाला केंद्रानं केली मदत

    30-May-2021
Total Views |
Raikar _1  H x



शिर्डी : टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनावर उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूला राज्यातील अकार्यक्षम आणि हतबल झालेली आरोग्य व्यवस्था कारणीभूत ठरली. पुण्यातील जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नव्हते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होता पण तिथे पोहोचण्यासाठी रुग्णवाहीका नव्हती, जीवंतपणी व्यवस्थेचा क्रूर खेळ पाहणाऱ्या रायकर यांच्या जाण्यानंतरही कुटूंबियांचे हाल काही संपलेले नाहीत. राज्य सरकारने त्यांच्या कुटूंबियांना अद्याप मदत केलेली नाही.



केंद्र सरकारने तत्परता दाखवत रायकर यांच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत पोहोचवली आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून पाच लाखांचे अर्थसहाय्य मिळाले. सप्टेंबरमध्ये रायकर यांचे निधन झाले. त्यानंतर वर्षभर त्यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडे मदतीची याचना करत होते. रायकर यांच्या पत्नी शीतल यांनीही फेसबुकवर सरकारच्या या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या त्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, त्याचे पुढे काय झाले याबद्दल नऊ महिन्यानंतरही काही उघड झालेले नाही.

देशातील ६७ पत्रकारांना मोदी सरकारची मदत


माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर झाला होता. त्यानुसार समितीच्या बैठकीत देशातील ६७ पत्रकारांच्या कुटुंबियांना प़त्येकी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले. राज्यातून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ही रक्कम मिळाल्याचे शितल रायकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.





केंद्र सरकारने रायकर कुटूंबियांना ही मदत दिली असली तरीही राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रायकर कुटूंबाला कसलीही मदत मिळालेली नाही. राज्यात एकूण १३६ पत्रकार कोरोनाचे बळी ठरले. त्यांच्या सर्व कुटूंबियांनी तातडीने केंद्र सरकारकडे मदतीसाठी अर्ज करावेत, या कुटुंबियांना तालुका पत्रकार संघांनी मदत करावी, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.



शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मागणी