‘कोरोना’ला जबाबदार चीन आणि अमेरिकाच?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-May-2021   
Total Views |

cell _1  H x W:
 
 

‘कोरोना’ विषाणू मानवनिर्मितच? : भाग-१

कोरोना विषाणूचा उगम चीनच्या वुहान शहरातूनच झाला, याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर रोखठोकपणे व्यक्त होण्यास प्रारंभी कुठल्याही माध्यमसंस्था फारशा धजावल्या नाहीत. महामारीच्या या दुसर्‍या लाटेत जेव्हा कोरोना विषाणूचे नवनवीन ‘म्युटंट’ जसे हळूहळू डोके वर काढू लागले, तेव्हादेखील बहुतांशी माध्यमे चीनविरोधी भूमिका न घेता मूग गिळून गप्प होती. मात्र, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ऑनलाईन वेबपोर्टल ‘महाएमटीबी’तर्फे मराठी माध्यमांमध्ये सर्वप्रथम निर्भीड भूमिका घेत ‘कोरोना विषाणू मानवनिर्मितच!’ ही मालिका तर्कसंगत दृष्टिकोनातून प्रसारित करण्यात आली. कोरोनाकाळाचा फायदा घेऊन सोयीस्करपणे विस्मृतीत गेलेल्या काही घटनांचा वेध घेऊन तर्कांच्या आधारे चीनच्या ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’मध्ये घडलेल्या घटनाक्रमांना उजेडात आणण्याचे काम यानिमित्ताने आम्ही करत आहोत. तसेच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकरच या प्रकरणी पारदर्शक चौकशीचे आश्वासन अमेरिका आणि ‘जागतिक आरोग्य संघटने’ने दिले आहे. तेव्हा, या सर्व पार्श्वभूमीवर मानवनिर्मित कोरोनाची पोलखोल करणारा या लेखमालिकेतील हा पहिला भाग...
 
 
 
कोरोनामुळे जगभरात आजघडीला ३४ लाखांहून अधिक माणसं दगावली. ३४ लाख कुटुंबातील कुणी ना कुणी आपला जीव गमावला. परंतु, ज्यांचे हात या रक्ताने माखले आहेत, त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कुणी धजावत नाही आणि तसे सबळ पुरावेही सहजासहजी आढळत नाहीत. चीनच्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा पहिल्यांदा उद्रेक झाला आणि फेब्रुवारी २०२० मध्ये डॉ. पीटर डेस्झॅक आणि त्यांच्यासारख्या बर्‍याच विषाणूतज्ज्ञांनी ‘लॅन्सेट’ नावाच्या जर्नलमध्ये ‘कोरोना हा नैसर्गिक विषाणू आहे,’ असा सांगणारा एक लेख प्रसिद्ध केला. क्रिश्चियान अँडरसन या शास्त्रज्ञाने आणखी असाच एक लेख लिहिला होता. नेमके याच दरम्यान चीन हेच कोरोनाचे मूलस्थान आहे, अशी शंकेची पाल सार्‍यांच्या मनात चुकचूकत होती. या चर्चांना पूर्णविराम देण्याचा तसेच जगाची एकूणच दिशाभूल करण्याचा प्रयत्न, अशाच काही लेखांद्वारे जागतिक पातळीवर करण्यात आला होता.




cell _1  H x W:
 
 
मानवी पेशींमध्ये कसा सोडला गेला कोरोनाचा विषाणू?
 
 
कोरोना विषाणू हा मानवनिर्मित आहे, ही शंका पुसून टाकण्याचा प्रयत्न अशाच काही चीनधार्जिण्या शास्त्रज्ञांनी केला. हा सगळा प्रकार सविस्तर समजून घेण्यापूर्वी मानवी पेशी नेमक्या कसे काम करतात, हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. मानवी शरीर हे पेशींचे बनलेले आहे. पेशींची रचना वर्तुळाकार असते, त्यात मध्यभागी या पेशीचा गाभा असतो. त्याला ‘न्यूक्लीअस’ (Nucleus) म्हणतात. भोवतालच्या आवरणाला ‘सायटोप्लाझम’ (Cytoplasm) म्हणतात. ज्याप्रमाणे आई घरात खाद्यपदार्थ तयार करते, त्यासाठी लागणारी पाककृती, साहित्य तिच्याकडे तयार असते. तशीच काहीशी रचना मानवी पेशींची केलेली असते. ‘सायटोप्लाझम’ (Cytoplasm) हे पेशींचे कोठारघर असते. ‘डीएनए’ या सर्वांना आदेश देऊन पेशींची निर्मिती करण्याचे आदेश देत असतो. मात्र, ‘डीएनए’ स्वतः काही कार्य करत नाही. पण, संदेशवाहक (मेसेंजर) आणि ‘आरएनए’ (Ribonucleic acid) हा पेशींची निर्मिती करतो, अशी सोपी प्रक्रिया शरीरात सुरू असते. उदा. आता जर का आई घरी नसेल आणि घरातील मुलांनी जर काहीही पाककृती माहिती नसताना एखादा पदार्थ बनवण्याचा घाट घातला, तर स्वयंपाकघराची जी अवस्था, पदार्थांची नासधूस होईल, अगदी तशीच अवस्था पेशींमध्ये विषाणू म्हणजे ‘आरएनए’ करतात. दुसर्‍यांच्या स्वयंपाकघरात जाऊन नासधूस करणार्‍या मुलांप्रमाणेच हे काम विषाणू करत असतात. दुसर्‍या पेशींमध्ये जाऊन हे विषाणू स्वतःसारखेच आणखी विषाणू तयार करतात. हे विषाणू म्हणजे ‘आरएनए’चेच एक स्वरूप असतात. पण, आपल्या परवानगीविना आपल्या स्वयंपाकघरात जसे कुणीही घुसू शकत नाही, कडी-कुलूप असते, तसेच एक कवच पेशींनाही असते. ते कवच कुणी सहजासहजी उघडू शकत नाही. त्या कवचाला उघडण्यासाठी किल्ली लागतेच...
 


wuhan_1  H x W:

 
सुरू होता आजार शोधून औषध बनवण्याचा धोकादायक खेळ!
 
 
‘कोविड’चा सुरुवातीचा विषाणू म्हणजेच ‘सार्स’ (SARS) हा वटवाघुळांमध्ये असायचा. विषाणूकडे वटवाघुळांच्या पेशींची किल्ली होती. अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी याच विषाणूद्वारे प्रयोग करण्याचे ठरवले. याच विषाणूद्वारे माणसांच्या पेशींच्या कुलुपांची किल्ली उघडण्याचे तंत्र आपण याच वटवाघळांच्या पेशींना शिकवू, असा कयास या शास्त्रज्ञांचा होता. म्हणजे एखाद्या महामार्गावरील धोकादायक वळणे शोधण्यासाठी एखादी भरधाव गाडी सोडायची म्हणजे त्या गाडीला अपघात व्हायचा आणि जिथे अपघात झाला तिथे सूचना फलक उभारायचे, असा हा धोकादायक प्रयोग या शास्त्रज्ञांनी केला. जो विषाणू माणसाला धोकादायक नव्हता, त्याचे दुर्गुण अधिक वाढवायचे आणि माणसाला धोका निर्माण करून मग त्यापासून माणसांना कसे वाचवायचे, याचे औषध आधीच तयार करायचे, असा हा सगळा पडद्यामागचा खेळ अमेरिकन संशोधक करत होते.
 
 
 

zang lee _1  H  
 

‘बॅटवूमन’ आणि साथीदारांनी केला प्रयोग
 
 
हे प्रयोग करायचे कुठे, तर त्यासाठी चीनमधील वुहान हे शहर निवडण्यात आले. डॉ. शी झेंग ली यांनी अमेरिकन नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठातून डॉ. राल्फ बेरीक यांच्याकडून विषाणूला पेशींमध्ये शिरण्यासाठी कसे प्रशिक्षण द्यायचे, याची माहिती घेतली. आता कोरोना विषाणूच्या किल्ल्या म्हणजे काय? कोरोना विषाणूचे चित्र आतापर्यंत आपण पाहिलेच असेल. कोरोनाच्या गोलाकार भागावर जे टोकेरी काटेदार आवरण असते, त्याच या किल्ल्या आहेत. त्या वापरून मानवी पेशीत जायचं आणि त्याचा संपूर्ण विनाश करून टाकायचा. हे काम हे विषाणू करतात. हे करण्यासाठी चीनला अमेरिकन सरकारकडून निधीही उपलब्ध झाला होता. ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ला सुमारे ४० लाख डॉलर्स मिळाले होते. खरंतरं अमेरिकेने या प्रकारच्या संशोधनावर बंदी घातली होती. कारण, जर महामारी पसरली तर मानवजातीवर हा प्रकार उलटू शकतो, हे सांगण्यात आले होते. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अशा मोहीम आखण्यास सवलत दिली जाऊ शकते, ही पळवाट काढून हा निधी दिला गेला. मुळात इथे अमेरिकेच्या सुरक्षेचा काही मुद्दाच नसतानाही हे प्रकरण रेटून संशोधनासाठी मुभा मिळवण्यात आली.
 


Dr. Peter Deszack  _1&nbs
 
‘कोरोना’ तयार करण्यासाठी मिळाले ४० लाख डॉलर्स
 
 
समजा, भविष्यात असा विषाणू आला तर त्यासाठी लस कशी तयार करावी, याची माहिती आपल्याला असावी म्हणून आपण हा प्रयोग करणार आहोत, यावर त्या सर्वांचे एकमत झाले होते. विषाणू तयार करायचा, तो बंद कसा करायचा हे सगळं शिकण्यासाठी म्हणून हा सारा खटाटोप आम्हाला करायचा आहे, असा शास्त्रज्ञांचा अट्टाहास सुरू होता. अमेरिकेची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चे (एनआयएच) अ‍ॅन्थोनी फाऊची यांनी ही रक्कम ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’ला दिली. पण, ही रक्कम थेट न देता डॉ. पीटर डेस्झॅकच्या माध्यमातून हा निधी देण्यात आला. न्यूयॉर्कच्या ‘इको हेल्थ अलायन्स’ या कंपनीतून ही रक्कम वुहानमध्ये पोहोचवण्यात आली, ज्याचे अध्यक्ष डॉ. पीटर डेस्झॅक आहेत. पुढे जाऊन या संशोधनाचे होणारे दुष्परिणाम पाहता स्वतःचे नाव त्यात येऊ नये म्हणून डॉ. फाऊची आणि डॉ. पीटर डेस्झॅक यांचे कारनामे उघड होतील म्हणून आधीच ‘लॅन्सेंट’ या जर्नलमध्ये लेख लिहून घेतले.
 


कोविडचा वाहक कोण (1) _1&n

 
‘कोरोना’ मानवनिर्मित असल्याचा पुरावा
 
 
कोरोना विषाणू हा सुरुवातीला नैसर्गिक असल्याचा दावा करण्यात आला होता. याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे जर हा विषाणू नैसर्गिकरीत्या आला असता, म्हणजेच वटवाघळांतून माणसांमध्ये आला असता, तर त्या वटवाघळांना किमान ज्या परिसरात संक्रमण पसरले आहे, तिथे पोहोचावे लागले असते. परंतु, वटवाघळे ही ५० किलोमीटर इतक्याच अंतरात फिरतात आणि वुहानपासून दक्षिण चीनच्या युनान प्रांतातील ‘मो जियांग’ खाण परिसरात आढळतात. हे ठिकाण वुहानपासून सुमारे ८०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे जो व्यक्ती संक्रमित झाला तोही वटवाघळांच्या संपर्कात आला नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, कोरोना हा विषाणू प्राण्यांवर काहीच अपाय करत नाही. वटवाघळांच्या शरीरात कोरोना विषाणू टोचला तरीही त्याला काहीच धोका होत नाही, हे आता प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. हा विषाणू मानवावरच परिणामकारक आहे, त्यासाठीच तो तयार केला गेलेला आहे, असे आता काही शास्त्रज्ञ दबक्या आवाजात का होईना, किमान कबूल करु लागले आहेत.
 

संशोधकांची बेफिकिरी
 
 
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या प्रयोगशाळेत हे संशोधन झाले तिथे ‘जैवसुरक्षा पातळी-२’ (बायोसेफ्टी लेव्हल-२) प्रकारची सुरक्षा व्यवस्था अमलात होती. अमेरिकेतील दंतचिकित्सकांकडे ज्या प्रकारची सुविधा असते, तशीच सोय इथेही असते. म्हणजे हॅण्डवॉश, सॅनिटायझर इत्यादीच... इतक्या गाफील राहून बॅटवूमन डॉ. शी झेंग ली काम करत होत्या. याच डॉ. शी झेंग ली यांनी स्वतःच लिहिलंय की, “आम्हाला काही झालं तर लसही उपलब्ध नव्हती. त्यामुळे काही अपाय झाला तर थेट मृत्यू अशी स्पष्ट कल्पना या प्रयोगशाळेत काम करणार्‍यांना होती आणि झालेही अगदी तसेच! सहा लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आणि तीन जण जेमतेम बचावले. ‘जैवसुरक्षा पातळी-४’ असायला हवी होती, तिथे ‘पातळी-२’ वर काम केले.”
 



wuhan lab _1  H

 
वुहानची प्रयोगशाळा म्हणजेच ‘कोरोना’चे मूळ?
 
 
वुहानच्या याच प्रयोगशाळेतून विषाणू बाहेर गेला असावा, असा काही जाणकारांचा अंदाज आहे. कारण, कोरोना हा या प्रयोगशाळेतून बाहेर जाण्याचा दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. चीन सरकार ज्याप्रकारे वुहानच्या प्रयोगशाळेच्या नोंदी लपवत होते, त्यानुसार हा अंदाज खरा की खोटा, हे स्पष्ट होते. तसेच ज्यावेळी ‘जागतिक आरोग्य संघटने’चे पथक वुहानच्या प्रयोगशाळेत पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी हेच डॉ. पीटर डेस्झॅक सोबत हजर होते. त्यामुळे तिथेही धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. हा विषाणू नैसर्गिक आहे, असा दावा वारंवार ‘जागतिक आरोग्य संघटने’पुढे ही मंडळी करत राहिले.



covid _1  H x W 
 

या पापाचे वाटेकरी कोण?
 
 
यामध्ये पहिला क्रमांक येतो तो म्हणजे चीनचे विषाणूतज्ज्ञ डॉ. शी झेंग ली आणि तिचे सहकारी जे जैवसुरक्षा ‘पातळी-२’ वर काम करत होते. दुसरे अर्थात त्यांना याकामी अर्थपुरवठा करणारे अमेरिकेचे संशोधक अ‍ॅन्थोनी फाऊची आणि डॉ. पीटर डेस्झॅक. तिसरे दोषी म्हणजे, अमेरिकेच्या विषाणूतज्ज्ञ, ज्यांनी डेस्झॅक यांच्या दिशाभूल करणार्‍या दाव्याला दुजोरा दिला. चौथे म्हणजे चिनी सरकार. कारण, तिथल्या सरकारला या सगळ्या प्रकाराची पुरेपूर कल्पना होती. तरीही सर्व माहिती दडवून ठेवण्यात आली. इतकेच की, ‘जागतिक आरोग्य संघटने’लाही याबद्दल माहिती देण्यास नकार दिला गेला. सर्वात शेवटचे दोषी म्हणजे प्रसारमाध्यमेही. आज फाऊची आणि डेस्झॅक दोघेही निवांत आहेत. पण, त्यांच्या या जीवघेण्या खेळाचा फटका संपूर्ण जगाला बसला. कोरोनामुळे जगभरात आजघडीला ३४ लाखांहून अधिक माणसं दगावली. ३४ लाख कुटुंबातील कुणी ना कुणी आपला जीव गमावला. परंतु, ज्यांचे हात रक्ताने माखले त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कुणी धजावत नाही, तसे त्यांनी पुरावेही ठेवलेले नाही. पण, सध्या वुहानच्या प्रयोगशाळेत शिजलेल्या त्या कटाची माहिती भविष्यातही पुढे येईल, अशीच अपेक्षा. (क्रमश:)
 

- चंद्रशेखर नेने

(संकलन :तेजस परब)
 
 
@@AUTHORINFO_V1@@