चीनमध्येच प्रयोगशाळेत तयार झाला कोरोना विषाणू?

    27-May-2021
Total Views |

Wuhan_1  H x W:

कॅलिफोर्निया / नवी दिल्ली : कोरोना विषाणू चीनमध्येच तयार झाला हा दावा फोल ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वारंवार दबाव निर्माण करण्यात आला होता. कोरोना वुहान लॅबमध्ये बनल्याचे दावे पहिल्या लाटेपासून केले जात होते. मात्र, फेसबुकने यासंबंधिची पोस्ट दिसताच ती थेट डिलीट करून टाकण्याची निती अवलंबिली होती. आता फेसबुकनेही यामध्ये बदल केला असून या पुढे अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या पोस्ट डिलिट करण्याच्या पॉलिसीत बदल करण्यात आला आहे.
 
कोरोना उगम चीनमधील वुहान शहरातूनच झाला याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होण्यास कुठल्याही माध्यमसंस्था आजपर्यंत धजावल्या नव्हत्या. महामारीच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा कोरोना विषाणूचे नवे म्युटंट दिसू लागले तरीही चीनविरोधात उघड भूमिका अद्याप कुणी घेतलेली नाही. दै.'मुंबई तरुण भारत'च्या ऑनलाईन वेबपोर्टल 'महाMTB'तर्फे मराठीत सर्वात प्रथम निर्भीड भूमिका घेत 'कोरोना विषाणू मानवनिर्मितच' ही मालिका तर्कसंगत दृष्टीकोनातून प्रसारित करण्यात आली.
 
कोरोना काळाचा फायदा घेऊन सोयीस्करपणे विस्मृतीत गेलेल्या काही घटनांचा वेध घेऊन तर्कांच्या आधारे चीनच्या 'वुहान इन्स्टीट्युट ऑफ वायरोलॉजी'मध्ये घडलेल्या घटनाक्रमांना उजेडात आणण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर लवकरच या प्रकाराची पारदर्शक चौकशी करण्याचे अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. याबद्दल महा MTBतर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांनी मराठीत पाहिल्यांदाच चीन आणि अमेरिकेतील काही विषाणूशास्त्रज्ञांनी कशाप्रकारे चीनच्या प्रयोगशाळेत हा भयानक खेळ चालवला होता याबद्दल गौप्यस्फोट केला होता. सविस्तर माहिती जाणूघ्या महा MTB वरील '७कोरोना विषाणू मानवनिर्मितच?' या मालिकेमधून...