नवी दिल्ली : नुकतेच 'द फॅमिली मॅन २'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानंतर पुन्हा एकदा या वेब सिरीजवर टीकेची झोड उठवण्यात आली. ट्रेलरमध्ये तमिळ लोकांचा संबध हा आयएसआयशी दाखवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. सोशल मिडियावर वेब सिरीज आणि दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. यानंतर आता 'मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम' पक्षाचे खासदार वायको यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलेले आहे. यामध्ये 'द फॅमिली मॅन २' या वेब सिरीजवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.
खासदार वायको यांनी पत्रात म्हंटले आहे की, "द फॅमिली मॅन २ या वेब सिरिजमध्ये तामिळ लोकांना आतंकवादी आणि आयएसआयचे एजंट असे दाखवण्यात आले आहे. त्यांचा सबंध पाकिस्तानी लोकांशी आहे असे चित्रित करण्यात आले आहे. अनेक तामिळ एलटीटीच्या कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे आणि या वेबसिरिजमध्ये त्यांचे काम आतंकवाद्यांसोबत जोडण्यात आले आहे. तमिळ " अशी टीका केली आहे.
पुढे त्यांनी पत्रात समंथा अक्किनेनी या वेब सिरीजमधील अभिनेत्रीवर टीका करताना म्हंटले आहे की, "अभिनेत्री सामंथा अक्किनेनी ही दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसत आहे. वेबसिरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या सर्व घटनेमुळे तामिळ लोकांच्या संकृतीचा अपमान करणाऱ्या आहेत. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संपूर्ण तमिळनाडूमधून या वेबसिरिजला प्रदर्शित करण्यास कडक नाराजगी आणि आपत्ति दर्शिवली आहे. ही वेब सिरीज प्रदर्शित होऊ नये, असे झाल्यास याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागतील." असे या पत्रात सांगितले आहे.