चीनचे विषाणूयुद्ध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
आता पुन्हा एकदा कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असल्याचे वृत्त आले आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने त्याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “चीनमधल्या वुहान येथे असलेल्या प्रयोगशाळेमध्ये हा विषाणू तयार करण्यात आला आहे.” विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकन प्रशासनानेच तसा अहवाल तयार केला होता.
 
 
आधुनिक युद्धामध्ये ‘जैविक युद्ध’ या प्रकारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, लढाऊ नौका, टेहळणी यंत्रे, अत्याधुनिक बंदुका यांचा वापर न करताही एखाद्या देशाला अथवा देशांच्या गटांना गुडघे टेकण्यास भाग पाडता येऊ शकते. दुसर्‍या महायुद्धात जर्मनी, ब्रिटन आदी देशांनी विषारी वायूंचा वापर केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्यांचा वापर हे जैविक युद्धाचे अगदीच प्राथमिक उदाहरण म्हणावे लागेल. त्यानंतर आतापर्यंत जैविक युद्धाने अत्यंत भयावह अशी प्रगती केली आहे. सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना अर्थात, चिनी विषाणूचा संसर्ग हादेखील जैविक युद्धाचा प्रकार असल्याचे कयास गतवर्षी संसर्गाच्या सुरुवातीला लावण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा अर्थाचे विधान केले होते. त्यानंतर मग जगभरातील ‘लिबरल इकोसिस्टीम’ने गोंधळ घालून, तसे काही नसल्याची वकिली केली होती.
 
 
मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असल्याचे वृत्त आले आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने त्याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “चीनमधल्या वुहान येथे असलेल्या प्रयोगशाळेमध्ये हा विषाणू तयार करण्यात आला आहे.” विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकन प्रशासनानेच तसा अहवाल तयार केला होता. बायडन प्रशासनाने सध्या त्या अहवालाविषयी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. मात्र, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने चिनी प्रयोगशाळेतूनच हा विषाणू जगभरात पसरल्याच्या सिद्धान्तावर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका अद्यापही आपल्या आरोपावर ठाम आहे.
 
 
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तामध्ये अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजी’मध्ये या विषाणूची निर्मिती करण्यात आली होती. त्यादरम्यान 2019 साली जेव्हा जगाला या विषाणूची कोणतीही कल्पना नव्हती, तेव्हा या प्रयोगशाळेत काम करणार्‍या तीन शास्त्रज्ञांना नोव्हेंबर महिन्यात याची लागण झाली होती आणि ते गंभीर आजारीही पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे चीनने जगापासून या विषाणूविषयी माहिती लपवून ठेवल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनने आणि त्यांच्या प्रभावात असलेल्या एका गटाने हे नाकारले, तरीही जगाला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण, जगात सर्वत्र अद्यापही संसर्ग पसरत असतानाही चीनमध्ये मात्र सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा विषाणू मानवनिर्मित असल्याच्या अमेरिकेच्या अहलावामध्ये तथ्य असल्याचे जाणवते. अर्थात, चीन आणि एक जागतिक व्यवस्था ही बाब कधीही स्वीकारणार नाही.
 
 
आता ‘जागतिक आरोग्य संघटने’चीही भूमिका कोरोना संसर्गास प्रारंभ झाल्यापासून संशयास्पदच राहिली आहे. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी चर्चा करण्यासाठी ‘जागतिक आरोग्य संघटने’ची एक बैठक सोमवारी पार पडली. अर्थात, ‘जागतिक आरोग्य संघटना’देखील कोरोना विषाणूविषयी जगाला सावध करण्यात, त्यानंतर विषाणूचे गांभीर्य सांगण्यास, उपचारांविषयी माहिती देण्यास अपयशी ठरली आहे. आता ‘जागतिक आरोग्य संघटना’ खरोखरच अपयशी ठरली की, जाणीवपूर्वक तसे केले गेले, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. कारण, ‘हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन’, ‘रेमडेसिवीर’ आणि आता लसींविषयीदेखील ‘जागतिक आरोग्य संघटने’ची भूमिका संशयास्पद राहिली आहे. त्यामुळे त्या बैठकीत फार काही निष्पन्न होईल, याची सुतराम शक्यता नाही.
 
 
यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, कोरोना विषाणूविषयी चीनची भूमिका ही निर्दयी आणि संशयास्पद राहिली आहे. चीनने आपल्या देशातील कोरोना संसर्गाची खरी स्थिती गतवर्षीपासून आजपर्यंत कधीही सांगितली नसल्याचाही आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळे चीनचा विस्तारवादाचा मनसुबा पाहता जगामध्ये अशाप्रकारचे आजार पसरवून जगातील अनेक देशांना बेजार करणे, चीनला आव्हान देणार्‍या देशांना अडकवून ठेवणे, जगातील लहान देशांना आपले मांडलिक बनवणे, असे प्रकार करण्यासाठी चीन कोरोना विषाणूचा वापर करू शकतो, हे अजिबात नाकारता येत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@