मुंबई : भाजप युवामोर्चा सचिव ऍड. प्रदीप गावडेंच्या बेकायदेशीर अटकेवरून आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकार पोलीस बळाचा वापर दडपशाहीसाठी करत असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी गावडेंच्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
सुनील देवधर म्हणतात,"हम क़त्ल करेंगे और चर्चा भी नहीं होने देंगे,आप सच बोलोगे तो... याद रखिये पुलिस हमारी जेब में है! ये है महाराष्ट्र की ठाकरे सरकार का रवैया.. शरजील उस्मानी के ख़िलाफ़ कारवाई होने का कारण बने भाजप महाराष्ट्र के युवामोर्चा के राज्य सचिव प्रदीप गावडे हिरासत में। धिक्कार" असा शब्दात देवधर यांनी प्रदीप गावंडेंवरील कारवाईचा निषेध केला आहे.
भाजपा युवामोर्चा सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुणे येथून बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले आहे. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.भाजपा युवा मोर्चाचे सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना वांद्रे पश्चिम, सायबर शाखेतर्फे बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, गावडे यांना ताब्यात घेताना पोलिसांना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही अथवा एफआयआरची प्रतदेखील दिलेली नाही. त्यांच्याविरोधात कलम १५३, १५३अ, २९५, ४६९, ५०० आणि ५०३ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.