‘चिनी अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ला कसे प्रत्युत्तर देणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2021   
Total Views |

china india_1  


सध्या चीन, भारत आणि जगातील अनेक देशांच्या विरुद्ध एक नियम नसलेले ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉर’ लढत आहे. एकाच वेळेला चीन भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध, लढत आहे, जे अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. चीन यामध्ये अनेक प्रकारच्या लढायांचा वापर करणार आहे. ही लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये घुसलेली आहे.


प्रतिबंधित युद्ध /‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’/(unrestricted war), किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध, संपर्क नसलेले युद्ध (नॉन कनेक्ट वॉर), ‘कायनेटिक वॉर’ (kinetic war) असे युद्धाचे अनेक प्रकार आहेत. या युद्धाला अमेरिका ‘मल्टी डोमेन वॉर’ असेसुद्धा म्हणते. काही तज्ज्ञ याला ‘हायब्रिड वॉर’ असे म्हणतात. ‘कायनेटिक वॉर’ म्हणजे यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने लढतात. सैनिक त्यांच्याकडे असलेली शस्त्रे रायफल, मशीन गन, तोफा, रणगाडे, विमाने, हेलिकॉप्टरचा वापर करतात. शस्त्रास्त्र आणि सैन्याच्या बळावर झालेल्या लढाईत बरेच नुकसान होते. अशी युद्धे खूप महाग असतात. परंतु, ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’मध्ये कमी किमतीमध्ये, न कळत आपल्याला शत्रूचे नुकसान करता येते. सध्या चीन, भारत आणि जगातील अनेक देशांच्या विरुद्ध एक नियम नसलेले ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉर’ लढत आहे. एकाच वेळेला चीन भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध, लढत आहे, जे अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. चीन यामध्ये अनेक प्रकारच्या लढायांचा वापर करणार आहे. ही लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये घुसलेली आहे. याचे एक सर्वात चांगले उदाहरण म्हणजे, चीनने जगाविरुद्ध/भारताविरुद्ध चालवलेले ‘चिनी व्हायरस’चे जैविक महायुद्ध.


अमेरिकेच्या ‘युद्ध’ संकल्पनेला प्रत्युत्तर


१९९१चे पहिले आखाती युद्ध ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’/‘गल्फ वॉर’ हे इराणच्या आखातामध्ये अमेरिका, तिच्या ३४ मित्रराष्ट्रांची आघाडी विरुद्ध इराक यांच्यात झाले होते. या युद्धामध्ये अमेरिकेने त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इराकचा पराभव केला. यामध्ये अमेरिकेकडून ‘नेटवर्क सेंट्रिंक वॉर’चा उपयोग केला गेला. यामुळे नंतर जगामध्ये युद्धाच्या संकल्पना (Doctrine/strategy/nature of war) पूर्णपणे बदलल्या. सगळ्या जगाला वाटू लागले की, आता यापुढची युद्धे ही तंत्रज्ञानाने जिंकली जातील, हिंसक (इंटेन्स) असतील, फार कमी दिवस (शॉर्ट ड्युरेशन) लढली जातील. ‘गल्फ वॉर’च्या आठ वर्षांनंतर दोन चिनी लष्करी अधिकार्‍यांनी ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉर’ म्हणजे नियम नसलेली युद्ध, ही युद्ध लढण्याची संकल्पना पुढे आणली. अमेरिकेच्या युद्ध लढण्याच्या संकल्पनेला ही नवीन संकल्पना एक प्रत्युत्तर मानले जाते.

त्यांनी असे म्हटले की, “या पुढच्या युद्धांमध्ये सैनिकांचा किंवा सध्या ज्ञात असलेली शस्त्रे म्हणजे तोफा, रणगाडे, विमाने यांचा वापर कमी होईल किंवा होणार नाही.” ‘क्लोजविटझ’सारखे युद्ध शास्त्रज्ञ असे म्हणतात की, “दोन देशांमध्ये युद्ध, करण्याचा मुख्य उद्देश असतो की, जिंकलेला देश पराभूत देशावर आपली इच्छा लादतो.” परंतु, चीनने तयार केलेल्या नवीन ‘युद्ध’ संकल्पनेमध्ये असे मानले गेले की, ‘अनरिस्ट्रिक्टटेड, ‘नॉन कॉन्टॅक्ट वॉर’चा वापर करूनसुद्धा आपली इच्छा शत्रूदेशावर लादता येईल.यापुढे सैनिक आणि देशातील इतर नागरिक यांच्या मधला फरक धुसर होत राहील. युद्ध, कुठेही, केव्हाही सुरू होऊ शकेल. यामध्ये युद्धाचे अनेक नवीन आयाम वापरले जातील. उदाहरणार्थ, आर्थिक युद्ध, व्यापार युद्ध, सांस्कृतिक युद्ध (कल्चरल वॉर), पर्यावरण युद्ध, कायद्याचे युद्ध (लीगल युद्ध), मुत्सद्देगिरीचे युद्ध (डिप्लोमॅटिक वॉर).


याशिवाय शत्रूदेशांमध्ये पैशाचा वापर करून काही जणांना फितूर केले जाईल. दुसर्‍या देशाचे काही राजकीय नेतृत्व, काही नोकरशाही, काही मीडिया कर्मचारी आणि इतर ज्यांना देशाची धोरणे बनवणारे, अशा सगळ्यांना पैशाचा वापर करून आपल्या बाजूला वळवले जाईल. लोकशाही संस्थांना विकत घेतले जाईल. काही राजकीय पुढारी, नोकरशाही, शास्त्रज्ञ, इतर तज्ज्ञ जे आपले विचार मान्य करणार नसतील, त्यांना भाडोत्री मारेकर्‍यांकडून मारले जाईल. ‘स्टॉक मार्केट’मधून घुसखोरी करून त्या देशाच्या कंपन्या कमी किमतीमध्ये विकत घेतल्या जातील. त्या देशाच्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामध्ये अनेकांना विकत घेतले जाईल. ज्यामुळे आपल्याला पाहिजे त्या ‘स्टोरीज’ किंवा बातम्या (नॅरेटिव्ह वॉरफेअर) मीडियामध्ये राबवल्या जातील. या युद्धाचा सर्वात मोठा नियम असेल की, या युद्धाला कुठलेच नियम नाही. हे युद्ध 24 तास, आठवड्यातून सात दिवस आणि वर्षातून 365 दिवस चालू राहील. या युद्धामध्ये बुद्धिबळाप्रमाणे वेगवेगळे मोहरे वापरले जातील. कधी ‘पॉलिटिकल वॉर’, कधी आर्थिक युद्ध, कधी आंतरराष्ट्रीय कायद्याचा वापर, कधी युद्धाच्या धमक्या देऊन, देशातील
नेतृत्वाला, मीडियाला आणि सैनिकांना घाबरविले जाईल.


‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’


‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. या युद्धात अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरल्या जातात. सतत हे केल्याने सर्वसामान्यांचा विचार बदलू लागतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात असे करणे पूर्वीपेक्षा सोपे आहे. ‘सायबर स्पेस’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही युद्धाची मुख्य शस्त्रे आहेत. भारत ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’चा शिकार आहे. भारताची अस्मिता, सार्वभौमत्व, सभ्यता, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण नष्ट करण्याचे ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ हे महत्त्वाचे साधन आहे. ‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ हे बाह्यरीत्या उत्तेजन देऊन, तथाकथित ऐतिहासिक, वांशिक, धार्मिक, सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक शोषणाचा गैरवापर करून, हिंसाचार वाढवून, त्याचे अपारंपरिक युद्धात परिवर्तन करते. राजवट बदल/ सरकार बदल किंवा प्रस्थापित सरकारच्या विचारसरणीत बदल केला जातो. भारत एक बहुसांस्कृतिक आणि बहुवंशीय देश आहे. जाती, जमाती, धर्म, राजकीय विचारसरणीतील मतभेदाचा वापर करून हिंसाचार भडकवला जाईल. लष्करी दबाव टाकून, आर्थिक युद्ध करून किंवा देशाला कर्जबाजारी करून, मानसिकदृष्ट्या दमदाटी करून घाबरवले जाईल.‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’चे एक पैलू म्हणजे ‘डिप्लोमसी’ची लढाई. यामध्ये चीन आंतरराष्ट्रीयस्तरावर वेगवेगळ्या ‘युनायटेड नेशन्स’च्या संस्थांमध्ये भारतास त्रास देतो. ‘डिप्लोमसी’ लढाईविषयी पुढच्या लेखात.


चीनने भारताच्या राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचे राजदूत काही राजकीय नेत्यांना भेटतात आणि त्यांना चीनमध्ये तिबेट किंवा मानस सरोवरला भेटीकरिता बोलावले जाते. त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी चिनी मीडियाला दिलेल्या मुलाखती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यामध्ये दिसेल की, ते भारताच्या राष्ट्रीयहिताविरुद्ध बोलतात.सरकारच्या विरुद्ध असलेल्या पत्रकारांना चीन भेटीवर बोलवले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून भारताच्या विरुद्ध लेख लिहिले जातात. भारतीय, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये (अमेरिका आणि युरोपमधल्या) मुलाखती प्रकाशित होतात. यामध्ये मानसिक युद्ध, अपप्रचार किंवा दुष्प्रचार युद्ध याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चीन ‘सायबर युद्धा’मध्ये भारतातल्या काही सरकारी ‘वेबसाईट्स’च्या आत घुसून माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहे.म्हणजे यामध्ये चीनकडे असलेल्या सर्वसमावेशक ताकदीचा म्हणजे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर’चा (comprehensive national power) वापर केला जातो. साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून, युद्ध न करता, शस्त्रांचा वापर न करता, हे युद्ध जिंकले जाऊ शकेल. अशी अनेक शस्त्रे वापरली जातील की, याविषयी जगाला काहीही कल्पना नसेल.

काय करावे?


या प्रतिबंधित युद्ध‘अनरिस्ट्रिक्टटेड वॉरफेअर’ला कसे प्रत्युत्तर द्यायचे? लक्षात असावे की, अशा युद्धात स्वतःचे रक्षण करणे हे नेहमीच कठीण असते. परंतु, अशाप्रकारची ऑपरेशन्स आपणसुद्धा चीनमध्ये करू शकतो. तुम्ही आमच्या राजकीय पक्षांमध्ये हस्तक्षेप केला तर आम्हीसुद्धा चीनच्या विरुद्ध असलेले काही प्रांत म्हणजे तिबेट, शिनजियांग, हाँगकाँग इथल्या नेत्यांशी संवाद साधून त्यांना राजकीय मदत करू शकतो. त्यांनाही भारतात पर्यटक म्हणून यायला आवडेल.चीनला ‘जशास तसे’ हीच भाषा कळते, म्हणून त्यांच्या मानवाधिकार संस्था, अल्पसंख्याकांच्या संस्थांशी आणि नेतृत्वांशी बोलून त्यांना राजकीय मदत करावी? आवडत नसेल, तर तुम्ही भारताच्या राजकीय जीवनामध्ये ढवळाढवळ करणे थांबवा, म्हणजेच जसे वेगवेगळे युद्ध चीन आपल्याबरोबर लढत आहे, तशाच प्रकारचे युद्ध आपण चीनविरोधात वेगवेगळ्या आघाडीवर सुरू केले पाहिजे. याशिवाय प्रत्येक भारतीयाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून या युद्धात आपले योगदान दिले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@