नवी दिल्ली : भारतात सलग सातव्या दिवशी, बरे होणार्या रुग्णांची दैनंदिन संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक असून गेल्या २४ तासांत ३ लाख, ६९ हजार, ०७७ रुग्ण बरे झाले. भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज २ कोटी, २३ लाख, ५५ हजार, ४४० वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून ८६.४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी ७५.११ टक्के रुग्ण दहा राज्यांतील आहेत.
गेल्या २४ तासांत २ लाख, ७६ हजार, ११० नवीन रुणांची नोंद झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन ३१ लाख, २९ हजार, ८७८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यात ९६ हजार, ८४१ ने घट झाली आहे. आता देशातील एकूण ‘पॉझिटिव्ह’ रूणांपैकी १२.१४टक्के रूग्ण उपचाराधीन आहेत. राष्ट्रीय मृत्युदर सध्या १.११टक्के आहे. गेल्या २४तासांत ३,८७४मृत्यूची नोंद झाली. नवीन मृत्यूंमध्ये दहा राज्यांमधील ७२.२५ टक्के देशात दिवसभरात ३ लाख, ६९ हजार, ७७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’
मृत्यूंचा समावेश आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ५९४ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये ४६८ मृत्यू झाले. गेल्या २४ तासांत २०.५५ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त चाचण्याची संख्या आहे. दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर घसरून १३.४४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत देशात २० लाख, ५५ हजार, ०१० लाख चाचण्या घेण्यात आल्या. देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसर्या टप्प्याअंतर्गत देशातील ‘कोविड -१९ लसींच्या एकूण मात्रांची संख्या आता १८.७० कोटींवर पोहोचली आहे.