केरळ निवडणूक २०२१ : एलडीएफच्या सुनामीत मेट्रोमॅन श्रीधरन यांची चर्चा

    02-May-2021
Total Views |

Keral_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : रविवारी सकाळी केरळमध्ये मतमोजणी सुरु झाली. यावेळी एकीकडे एलडीएफ आघाडीवर असताना भाजपचे मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांच्या विधानसभा निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे. ते पल्लकड विधानसभा मतदारसंघातून अंदाजे ३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पलक्कड, त्रिशूर आणि नेमोन या जागांवर आघाडीवर आहे. ई. श्रीधरन यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शफी पराम्बिल यांना मागे टाकले आहे.
 
 
 
सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. माकपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एलडीएफला राज्यातील १४० पैकी ७५ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर काग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफला ५६ जागांवर आघाडी मिळाली आहे. १४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ७१ आहे. तर मतमोजणीच्या काही फेऱ्यानंतर एलडीएफ आघाडीवर आहे. एलडीएफने सध्या आघाडी घेतली असून युडीएफ ४६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पिनराई विजयन यांची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहे. असे झाल्यास मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षाला सत्तांतर होतं होते. मात्र, चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्या विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळणार आहे.