'महा MTB' दणका - इंदापूर माळरानावरील खोकड मृत्यूप्रकरणी २ आरोपी अटक

    02-May-2021
Total Views |
indapur _1  H x




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
छायाचित्रांसाठी पुण्यातील इंदापूरच्या माळरानावर अधिवास करणाऱ्या खोकडांच्या जीवाशी खेळ सुरू असून यामध्ये काही पिल्लांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दै.'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) प्रसिद्ध केले होते. यावर वन विभागाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. 'महा MTB'ने बातमीमध्ये नमूद केलेल्या आरोपींच्याच वन अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत.
 
 
 
 
इंदापूर मधील पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भिगवण पासून काही किलोमीटर अंतरावर कळसचे माळरान आहे. या माळरानावर विविध जीवांचा अधिवास असून सदर ठिकाणी काही स्थानिक अप्रशिक्षित गाईड्स कडून पर्यटकांना छायाचित्रणासाठी आणले जाते. या ठिकाणी खोकड ( इंडियन फॉक्स) आणि त्याच्या या पिल्लांचे छायाचित्र काढण्यासाठी वर्दळ असते तथापि खोकड आणि त्याच्या पिल्लांची काही हौशी छाया चित्रकारांकडून छायाचित्र काढण्याच्या नादात अप्रशिक्षित गाईड्स कडून काही अनुचित प्रकार केले असल्याचे निदर्शनास आले होते. या वन्य प्राण्याचे पिल्लांचे छायाचित्र मिळावे म्हणून त्यांच्या जमिनीत केलेल्या बिळांसमोर कोंबडीचे मांस टाकण्याचे प्रकार या ठिकाणी केले जात होते. ज्यामधून काही पिल्लांचा मृत्यू झाला होता. याविषयी 'महा MTB'ने २९ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करुन संबंधित गाईड्सवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या वृत्ताची दखल वन विभागाने घेऊन कारवाई केली आहे.
 
 
 
 
प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर पुणयाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी आरोपी दत्ता नामदेव कुंडारे आणि गणेश बापू भोई यांना अटक केली. या दोघांची नावे महा MTBने प्रकाशित केलेल्या वृत्तामध्ये छापण्यात आली होती. या आरोपींनी वन्यजीवांच्या अधिवासास धोका निर्माण केल्यामुळे आरोपींना अटक केली असून त्यांचे विरुद्ध वन्य जीव( संरक्षण )अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,११,५१ तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) (डी) (आय) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर यांचे न्यायालयात हजर कण्यात आले. त्यानंतर आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या गुन्ह्यातील सह आरोपी टूर ऑपरेटर आणि हौशी वन्यजीव छायाचित्रकारांचा शोध वनाधिकारी घेत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

सामान्य तिकीट घेऊन फर्स्ट क्लासचा प्रवास करताय?; टीसी आकारणार दंड

मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी मोहीम” राबविण्यात येणार आहे. अनेकदा प्रथम श्रेणी डब्यात सामान्य तिकीट घेऊन अथवा तिकीट ना काढता प्रवास करणाऱ्यांमुळे गर्दी होते. त्यातून अनेकदा वाद निर्माण होतात. हेच लक्षात घेता प्रथम श्रेणी तिकीट अथवा पास घेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये “केंद्रित तिकीट तपासणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121