मुख्यमंत्री संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! अर्थात स्क्रीनवरून...

    19-May-2021
Total Views | 180
KESHAV UPADHYE _1 &n




विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! 'अर्थात स्क्रीनवरून, असे म्हणत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.


मंगळवारची सकाळ उजाडली. सीएमसाहेबांना जाग आली आणि ते हॉलमध्ये आले. अलीकडे त्यांचा सतत प्रवास सुरू असतो. डायनिंग रूम, तिथून लिव्हिंग रूम, कधीतरी कॉन्फरन्स रूम...पायाला भिंगरी लागल्यागत सीएमसाहेब फिरत असतात. आज सवयीप्रमाणे अगोदर डायनिंग रूम मध्ये न जाता साहेबांनी प्रवासाची दिशा वळवली आणि प्रोटोकाल धावपळ उडाली. हटलमधल्या स्टाफला कोणतीच पूर्व सूचना नसल्याने तेथील कर्मचारीही भांबावून गेले. तिकडे लक्ष न देता सीएमसाहेब आपल्या खुर्चीत बसले. खुर्चीच्या हातावर कोरलेल्या लाकडी सिंहांना कुरवाळत त्यांनी एक जांभई दिली.रात्री बराच वेळ आढावा बैठक सुरू होती. सारी माहिती मिळाल्यावर, संकटग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा असे आदेश देऊनच सीएमसाहेब झोपी गेले. सीएमसाहेबांनी आदेश दिल्यामुळे संकटग्रस्त भागात पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू झाली.

तिकडे संकट वाढतच होते. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती, भेदरलेली मुलंबाळ कोपऱ्यात बसून बाहेरचं तांडव पाहात होती. संकटग्रस्त भागातील आढावा बैठक बराच वेळ सुरू होती. सकाळी सीएमसाहेबांना रिपोर्ट पाठवायची जबाबदारी एकावर सोपवून सर्वांनी डिनर घेतले, आणि ते घरोघर परतले. सीएमसाहेब हॉलमध्ये येताच त्यांच्या स्पेशल सीईओने कानाजवळ जाऊन काही सल्ला दिला, आणि साहेब गंभीर झाले. खुर्चीच्या हातावरच्या सिंहाना कुरवाळणे थांबवून ते मनगटातलं धाग्याचं बंधन पिरगळू लागले. आता साहेब काहीतरी महत्वपूर्ण बोलणार हे सीईओने ओळखले होते. त्याने तातडीने खूण केली, आणि साहेबांसमोरच्या टीपॉयवर लॆपटॉप सुरू झाला. सीईओने पलीकडे संकटग्रस्त भागात एका अधिकाऱ्यास फोन लावून संकटग्रस्त नागरिकांस तातडीने ऑनलाइन आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही क्षणांतच सीएमसाहेबांच्या लॅपटॉप स्क्रीनवर संकटग्रस्त नागरिक मोठ्या अपेक्षेने सीएमसाहेबांकडे पाहात होते.

सीएमसाहेबांनी चेहरा अधिक गंभीर केला, आणि ते बोलू लागले...'या संकटात मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून संकटाच्या छाताडावर पाय देऊन त्याला, पळवून लावले आहे. मदतीसाठी मी केंद्राला आजच पत्र पाठव्णार आहे. माझ्या कोकणाचे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही'... असे बोलून सीएमसाहेबांनी हात उचलला. स्क्रीनवर एक संकटग्रस्ताचे अश्रू अनावर झाले होते. साहेबांनी मायेने स्क्रीनवरील त्याच्या चेहऱ्यावर हात फिरविला. त्याचे स्क्रीनवरील अश्रू पुसले, आणि आभासी सांत्वन आटोपून सीएमसाहेब नव्या आभासी आढावा बैठकीसाठी तयार झाले. उठताउठता सीईओकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले, व म्हणाले, "संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तिकडे जावे लागत नाही. मायेचा स्पर्श घरबसल्या केलेला मायेचा स्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचतो. माझा दीड वर्षांचा अनुभव आहे. मी घरातूनच राज्य चालवतोय..." सीईओने मान हलवून कौतुकाने साहेबाकडे पाहिले. तिकडे ऑफिसमधून प्रेसनोट जारी झाली होती, 'मुख्यमंत्र्यांनी संकटग्रस्तांचे अश्रू पुसले!'

- केशव उपाध्ये, भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121