मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरता घेण्यात येणारी सेट अर्थात राज्य पात्रता परीक्षा येत्या २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून अर्ज भरता येणार असून १० जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.