संभाजी पाटील यांची पुनःस्थापना म्हणजे सचिन वाझेचा पुनर्जन्मच

    08-Apr-2021
Total Views |

Sachin Waze_1  




मुंबई
: “गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यांत आरोपी असलेल्या संभाजी पाटील या निलंबित कर्मचार्‍याला पुन्हा सेवेत घेणे म्हणजे सचिन वाझेचा पुनर्जन्मच होत आहे,” अशी टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवारी फौजदारी गुन्ह्यांत आरोपी असलेल्या संभाजी पाटील या निलंबित कर्मचार्‍यास सेवेत पुन्हा रुजू करून घेण्याच्या प्रस्तावावर बुधवार, ७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत वादळी चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत २४ फेब्रुवारी रोजी आणला होता.
 
 
 
“संभाजी पाटील या निलंबित कर्मचार्‍याची पुनःस्थापना म्हणजे दुसर्‍या सचिन वाझेचा महापालिकेत पुनर्जन्म होत आहे,” अशी टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या महाविकास आघाडीने बहुमताच्या जोरावर आमच्या उपसूचना फेटाळून लावत प्रस्ताव मंजूर केला आहे. याचा निषेध करत आम्ही सभात्याग केला, अशी माहिती भाजपतर्फे देण्यात आली.



धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रस्ताव आणण्यापूर्वी महापालिका आयुक्त, कायदा अधिकारी, उपायुक्त सामान्य प्रशासन, प्रमुख चौकशी अधिकारी, निलंबन पुनर्विलोकन समिती यापैकी कोणाचेही अभिप्राय घेतलेले नाहीत. मग प्रश्न उपस्थित होतो की, एका अधिकार्‍याला सेवेत घेण्यासाठी सत्ताधारी इतका आटापिटा का करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.