दहावी-बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत पार पाडाव्या : अभाविप

    06-Apr-2021
Total Views |

abvp _1  H x W:




शिक्षणमंत्र्यांकडे अभाविपने केल्या काही विशेष मागण्या


मुंबई: शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इ. दहावी व बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्याच्या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वागत करण्यात आले आहे. इ दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे एकूण महत्त्व लक्षात घेता कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत राज्याचा शालेय विभाग परीक्षा सुरळीत पार पडण्याचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे. तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अभाविपच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनामार्फत काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:


१) वाढती उष्णता लक्षात घेता परीक्षेच्या वेळेत योग्य ते बदल करावे.

२) महाराष्ट्रात, खासकरून 'एमएमआरडीए' भागात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आपल्या घराजवळेचे निवडण्याची मुभा द्यावी.

३) ताळेबंदीचा विचार करता परीक्षार्थींना लोकल, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस आणि महानगरपालिकाच्या बसेसची सुविधा परीक्षेच्या कालावधीत उपलब्ध करून द्यावी.

४) कोरोनाची स्थिती लक्षात घेता शाळा व महाविद्यालयांद्वारे निर्जंतुकीकरणाची व्यवस्था प्रभावी करण्यात यावी.

५) विशेष परिस्थितीत शिक्षकांना पेपर घरी तपासण्याची मुभा देण्यात यावी.


तसेच या मागण्यांसोबतच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही अडचण आल्यास त्यांनी निःसंकोचपणे अभाविपशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी केले.