तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक ; मध्य आणि पश्चिम रेल्वेची माहिती

    03-Apr-2021
Total Views |

mega bloc_1  H



मुंबई
: मध्य आणि पश्चिम रेल्वेने उद्या तिन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या स्थानकाच्या दरम्यान सकाळी ११:०० ते दुपारी ०४:०० दरम्यान मेगाब्लॉक असल्याने धीम्या मार्गावरील फेर्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.


हार्बर लाईनवरील पनवेल ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान सकाळी ११:०५ ते ०४:०५ दरम्यान मेगाब्लॉक असून या दरम्यान सीएसटीवरुन पनवेल-बेलापुरसाठीच्या फेर्या बंद असतील. ब्लॉक दरम्यान या मार्गावर विशेष रेल्वे चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते विरार या दरम्यान शनिवारी रात्री१२:३० ते रविवारी पहाटे ०४:३० पर्यंत मेगाब्लॉक असेल, रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे.