‘क्रेडाई’चा महत्त्वपूर्ण निर्णय

    03-Apr-2021
Total Views |

CREDAI_1  H x W
 
 

बांधकाम सेवकांना मोफत लस देणार

 
 
नाशिक : कृषीक्षेत्रानंतर बांधकाम क्षेत्र हे देशातील दुसर्या क्रमांकावर असंघटित क्षेत्राला रोजगार देणारा उद्योग आहे. ‘क्रेडाई’ने आपल्या बांधकाम सेवकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असल्याने कामगार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. ‘क्रेडाई’ (कॉन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स) ही देशातल्या २१ राज्यांतील १३०० पेक्षा जास्त ‘रिअल इस्टेट डेव्हलपर्स’ची संघटना आहे. त्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पटोडिया यांची निवड झाली. अध्यक्षपदावर निवड होताच हर्षवर्धन पटोडिया यांनी मंगळवारी ‘क्रेडाई’कडून देशातल्या २.५ कोटी बांधकाम सेवकांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. ‘रिअल इस्टेट डेव्हलपर्स’ची संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ने आता देशातल्या २.५ कोटी बांधकाम सेवकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. ‘क्रेडाई’चा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या घोषणेच्या माध्यमातून ‘क्रेडाई’कडून देशात केंद्र सरकारने सुरू केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेला गती देणे आणि देशातल्या गरजू लोकांना कोरोनाची लस देऊन कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्यात येणार असल्याचे पाटोडिया यांनी यावेळी सांगितले.
 
‘क्रेडाई’ राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अनंत राजेगावकर
 
 
‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुण्याचे सतीश मगर यांची निवड झाली असून ‘क्रेडाई-नाशिक मेट्रो’चे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. सदर निवड २०२१-२३ या कालावधीसाठी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन’ सोहळ्यामध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये नाशिकचे वर्चस्व दिसून आले. ‘क्रेडाई-नाशिक मेट्रो’चे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांची राष्ट्रीय ‘क्रेडाई’च्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय ‘क्रेडाई’च्या श्वेतपत्रिका समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ‘क्रेडाई-नाशिक मेट्रो’ व ‘क्रेडाई महाराष्ट्रा’चे माजी अध्यक्ष अनंत राजे गावकर यांनी क्रेडाई संस्थेसाठी भरीव कार्य केले असून संघटना वाढीसाठी राज्यभरामध्ये ‘क्रेडाई’चे अनेक ‘चॅप्टर’ सुरू केले असून बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले.