सुजय विखेंनी आणले रेमडीसिवीर: न्यायालयाने राज्य सरकारला घेतले फैलावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2021   
Total Views |



sujay_1  H x W:


औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल झाली याचिका


संभाजीनगर : भाजपचे युवा खासदार सुजय विखे पाटील यांनी दहा हजार रेमडीसिवीर आणून नगर जिल्हयासाठी उपलब्ध करून दिले. त्याविषयीचे व्हिडिओ आणि बातम्या समाजमाध्यमात व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल करण्यात आली आहे. त्याविषयी आज सुनावणी झाली.


सुजय विखे पाटील यांनी चार्टर्ड विमानातून दहा हजार रेमडिसीवीर नगर जिल्ह्यात आणले होते. मात्र सुजय विखे पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्याकरीत्या याचिकेतून राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.

अरुण पुंजाजी कडू , एकनाथ चंद्रभान घोगरे, बाळासाहेब केरूनाथ विखे आणि श्री. दादासाहेब कुशाबापू पवार यांनी याचिका दाखल केली आहे. सुजय विखे यांनी रेमडीसिवीर कसे आणले हा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

आज २६ एप्रिल रोजी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच एक खासदार तुमच्या नाकाखालून रेमडीसीवर आणतातच कसे, असा सवाल न्यायमूर्तींनी उपस्थित केला. याचिकाकर्त्यांनीदेखील ही याचिका राज्य सरकारविरोधात दाखल केली आहे. 

याविषयीची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@