मुंबई : सध्या रक्त आणि प्लाझ्माचा तुटवडा पाहता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि जाणता राजा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीक्षा नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . कोविडच्या दुसर्या लाटेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवकांमध्ये रक्तदानासाठी अभियान राबवत आहे .या अभियानाच्या अंतर्गत आज प्रतीक्षा नगर येथील चुना भट्टी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले , या शिबिरामध्ये एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अभाविप प्रतीक्षा नगर मंत्री ,अभिषेक जयस्वाल म्हणाले, " प्रतीक्षा नगर मध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करत आहोत , मुंबई मध्ये रक्ताचा तुटवडा कसा कमी होईल याचे प्रयत्न आम्ही करत आहोत , तसेच प्रतीक्षा नगर परिसरामध्ये प्रशासनाला या संकटाच्या परिस्थिती मध्ये मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
"सध्याची परिस्तिथी ही खुप वेगळी आणि गंभीर आहे, अभाविप सुद्धा इतर सामाजिक संस्थां प्रमाणेच सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहे व यापुढे नेहमीच घेत राहील. अभाविप मुंबई महानगर म्हणून मुंबई मधील सर्व रुग्णालय तसेच रक्तपेढ्यांमध्ये सर्वे करून कोणत्या ठिकाणी किती व कोणत्या रक्तगटाचा साठा उपलब्ध आहे त्याची माहिती गोळा करीत आहोत.
आपल्या सर्वांना या परिस्थिती ला सामोरे जाऊन या सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग काढायचा आहे. आम्ही मुंबई महानगर पालिका तसेच मुंबई मधील सर्व रुग्णालय प्रशासन यांना सांगू इच्छितो की कुठल्या ही प्रकारची मदत व सेवाकार्या साठी अभाविपचे कार्यकर्ते सदैव मदत करायला तत्पर असतील" असे प्रतिपादन अभाविप मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी केले.
मदत केंद्र व हेल्पलाईन नंबरचे उद्घाटन
सध्याला कोरोनाच्या परिस्तिथी चा उद्रेक होत असून सर्वजन या परिस्थिती ला सामोरे जात असताना , आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर मुंबईच्या माध्यमातून स्टूडेंट फॉर सेवाच्या (SFS) अंतर्गत पश्चिम बोरीवलीच्या पुरोहित हॉस्पिटल मध्ये मदत केंद्राचे उद्घाटन करून हेल्पलाईन नंबर जाहिर करण्यात आले . ह्या मदत केंद्राचे उद्घाटन पुरोहित हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. महेश राजपुरोहित यांच्या हस्ते झाले. या शुभ प्रसंगी पुरोहित हॉस्पिटल चे सचिव दिपक चव्हाण जी सह अभविपचे मुंबई महानगर सहमंत्री सागर पांडे आणि सर्व उत्तर मुंबईचे कार्यकर्ते उपस्थित होते. " हे मदत केंद्र व हेल्पलाईन नंबर अभाविपचे कार्यकर्ते यांनी पूर्ण मुंबई मध्ये बेडची उप्लब्धता व कोरोना संदर्भात मदत करण्यासाठी जाहिर केले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत पुरोहित हॉस्पिटल मध्येच अभविपचे कार्यकर्ते सेवा करतील व ह्या परिस्तिथी वर मात करण्यात मदत करतील" अशी माहिती मुंबई महानगर सहमंत्री सागर पांडे यांनी दिली.
अभाविपचे कार्यकर्ते सदैव तत्पर
"सध्याची परिस्तिथी ही खुप वेगळी आणि गंभीर आहे, अभाविप सुद्धा इतर सामाजिक संस्थां प्रमाणेच सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहे व यापुढे नेहमीच घेत राहील. अभाविप मुंबई महानगर म्हणून मुंबई मधील सर्व रुग्णालय तसेच रक्तपेढ्यांमध्ये सर्वे करून कोणत्या ठिकाणी किती व कोणत्या रक्तगटाचा साठा उपलब्ध आहे त्याची माहिती गोळा करीत आहोत. आपल्या सर्वांना या परिस्थिती ला सामोरे जाऊन या सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग काढायचा आहे. आम्ही मुंबई महानगर पालिका तसेच मुंबई मधील सर्व रुग्णालय प्रशासन यांना सांगू इच्छितो की कुठल्या ही प्रकारची मदत व सेवाकार्या साठी अभाविपचे कार्यकर्ते सदैव मदत करायला तत्पर असतील" असे प्रतिपादन अभाविप मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिरराव यांनी केले.
जाहीर आवाहन
येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. तरी ह्या लसीकरण मोहिमेमध्ये आपण सर्वजण सहभागी व्हालच. परंतु लसीकरण झाल्यावर 60 दिवस 2 महिने कोणालाही रक्तदान करता येऊ शकणार नाही. त्यामुळे सद्यस्तिथी पाहता रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना आवाहन करते की, त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यापूर्वी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इच्छुक रक्तदात्यांनी खलील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिद्धांत बनकर -08369991880
तेजस लिंगायत - 09967029725
तेजस सावंत -08879754015
कीर्ती - 09082330653