ऑक्सिजन एक्स्प्रेसची कमाल! 24 तासात पोहोचवला 150 टन प्राणवायु

    24-Apr-2021
Total Views |



modi piyush_1  


केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाची कौतुकास्पद कामगिरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कोव्हिडकाळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस पाठविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ऑक्सीजन एक्स्प्रेस सुरू केल्याच्या 24 तासांत 150 टन प्राणवायू देशभरात विविध ठिकाणी पोहोचविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.

भारतीय रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली आहे. द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूने भरलेले टँकर्स घेऊन आलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेसेस आज महाराष्ट्रातील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पोहोचले. काही टँकर वाटेतील नागपूर आणि वाराणसी येथे संबधित भागातील प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उतरवण्यात आले. याशिवाय आज सकाळी लखनऊ येथून तिसऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आपल्या प्रवासाला आरंभ केला.



ox1_1  H x W: 0
फोटो : नाशिक 

आंध्रप्रदेश, दिल्ली यासारख्या काही राज्यांनी अजून अशा एक्स्प्रेस पाठवण्याबाबत रेल्वेशी चर्चा सुरू केली आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरुप प्राणवायूने भरलेले टँकर्सचा विशाखापट्टणम व बोकारो येथे जाण्यासाठीचा प्रवास भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवेमार्फत सुरू आहे.

वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूची उत्तर प्रदेशची गरज भागवण्यासाठी लखनऊ व वाराणसी दरम्यान विशेष प्रवासी मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार केला आहे. हे 270 किमी चे अंतर ताशी सरासरी 62.35 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाडीमुळे 4 तास 20 मिनिटात कापले जाते. आतापर्यंत 10 कंटेनर्सनी जवळपास 150 टन प्राणवायू पोहोचवला आहे.

लांब पल्ल्यासाठी रेल्वेने प्राणवायूची वाहतूक करणे हे रस्ते वाहतूकीपेक्षा जलद गतीने होते. रेल्वे वाहतूक पूर्णवेळ (24X7) सुरू राहू शकते .
गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत रेल्वेने अत्यावश्यक जीवनोपयोगी वस्तूंची वाहतूक करून पुरवठा साखळी अबाधित राखली होती, आणि संकटाच्या काळात देशसेवेचे कर्तव्य बजावले होते.