आणखी एक पोलीस अधिकाऱ्याला एनआयएने केली अटक

    23-Apr-2021
Total Views |


nia_1  H x W: 0


मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने मुंबई एनआयएने दलातील पोलिस निरीक्षक सुनील माने यांना गुरुवारी रात्री अटक केली. मनसुख हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. मानेला शुक्रवारी
, २३ एप्रिल रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुकेश अंबानीच्या घराजवळ मिळून आलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यां ची ४मार्च रोजी हत्या करून मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत टाकण्यात आला होता. ५ मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंब्रा खाडीत मिळून आला होता. ही हत्या सचिन वाझे हा मुख्य आरोपी असून त्याला मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे याला मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने याने मदत केली होती. या प्रकरणी मानेला राज्यांच्या एटीएस पथकाने चौकशीला बोलावले होते.

त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएने या प्रकरणात दोन वेळा मानेकडे चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री एनआयएने सुनील माने याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन रात्री उशिरा मानेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आज माने यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सुनील माने हे मागील काही पूर्वी देखील वादात अडकले होते. मनसुख हिरेन प्रकरणात माने याचे नाव येत असल्याकारणावरून मुंबई गुन्हे शाखेतून त्याची तडकाफडकी बदली करून हत्यार विभागात बदली करण्यात आली होती.

या प्रकणात ही तिसरी अटक असून यापूर्वी बडतर्फ पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात एका या गुन्ह्यात आणखी काही आजी माजी अधिकारी यांना अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी या दोघाना अटक करण्यात आलेली असून दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.