अभाविपचे विलेपार्ले येथे रक्तदान शिबीर

    22-Apr-2021
Total Views |

ABVP_1  H x W:
 

मुंबई : मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता, शहरामध्ये रक्ताची आणि प्लाझ्माची मोठी गरज असल्याचे दिसत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अभाविप ने विद्यानगरी भागातील विले पारले उपनगरामध्ये रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
 
 
अभाविपतर्फे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान रक्तदान अभियान मुंबईतील तरुणांना प्रोत्साहन देत आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त चेंबूर व दहिसर येथे या अभियानाची सुरुवात झाली तसेच बुधवारी दादर आणि आज गुरुवारी विद्यानगरी येथे हे अभियान पार पडले ज्या मध्ये एकूण ५१ ,५२ ,२३ आणि १५ असे क्रमशः रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.
 
 
यावेळी अभाविप कोकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या की, “आज रक्तदानाची गरज संपूर्ण समाजाला आहे, म्हणून समाजातील सर्व लोकांनी या अभियानात आपले योगदान द्यावे. अभाविप सेवा भावनेने काम करीत आहे आणि भविष्यातही असे करत राहील, खरं तर कोरोना संसर्गाची परिस्थिती भयानक आहे.”
 
 
“अभाविप मुंबई महानगर म्हणून आम्ही मुंबईच्या सर्व रुग्णालये आणि रक्तपेढीमध्ये रक्त कुठे आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही मुंबई महानगरपालिका तसेच मुंबईच्या सर्व रुग्णालय प्रशासनाला सांगू इच्छितो की अभाविप कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आणि सेवेच्या कामांसाठी सदैव तत्पर आहे ”असे मुंबई महानगर मंत्री गौतमी अहिराराव यांनी सांगितले.